स्टेडियमच्या बांधकामाने मोठे स्वप्न साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:27 PM2018-08-16T21:27:59+5:302018-08-16T21:29:10+5:30
साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
खासदार विकास निधी अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक स्मारक व शहीद अशोक गेडाम स्मृती स्तंभ तसेच शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगर पालिका कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या माळ्याच्या विस्तारीत बांधकाम व मिनी स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्याच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. न.प. च्यावतीने साडेतीन कोटीच्या खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ खा. तडस यांच्या हस्ते झाला.
अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, बांधकाम सभापती सारीका लाकडे, शिक्षण सभापती कल्पना ढोक, आरोग्य सभापती सुनिता बकाने, महिला बालकल्याण सभापती सुनिता ताडाम तसेच न.प. सदस्य नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, संध्या कारोटकर, संगीता तराळे, मारोती मरघाडे, अ. नईम आदींची उपस्थिती होती.
नगर परिषदेला १५१ वर्ष पूर्ण झाली. न.प. माध्यमिक शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली. या दोन्ही बाबी देवळीकरांसाठी गौरवास्पद आहेत त्यामुळे येत्या २ आॅक्टोंबरला महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवात सामाजीक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाºया माजी विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात येणार आहे, असे खासदार तडस यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.