तळेगाव-पुलगाव मार्गाचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:17+5:30

तळेगाव (श्या.पं.) ते पुलगाव मार्ग बांधकामाला मंजुरी मिळाली. दीड वर्षापासून कामाला सुरूवात झाली; मात्र कंत्राटदाराने कामाचे नियोजन केले नाही. टप्प्याटप्याने काम करणे गरजेचे असताना संपूर्ण रस्ताच खोदून ठेवला. मार्गावरील पूल तोडून मोकळे केले. अशातच बांधकाम देयकाअभावी आणि नंतर लॉकडाऊनमुळे काम रखडले.

Construction of Talegaon-Pulgaon road stalled | तळेगाव-पुलगाव मार्गाचे बांधकाम रखडले

तळेगाव-पुलगाव मार्गाचे बांधकाम रखडले

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : अवघ्या ११ किलोमीटर मार्गाच्या बांधकामाला १५ महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र काम पूर्ण झाले नाही. बांधकामाकरिता मार्गावरील पूल तोडून रस्त्यावर खोदकाम करण्यात आले. पावसाळा सुरुवात झाली. परिणामी, तळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची स्थिती असून याकडे बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तळेगाव (श्या.पं.) ते पुलगाव मार्ग बांधकामाला मंजुरी मिळाली. दीड वर्षापासून कामाला सुरूवात झाली; मात्र कंत्राटदाराने कामाचे नियोजन केले नाही. टप्प्याटप्याने काम करणे गरजेचे असताना संपूर्ण रस्ताच खोदून ठेवला. मार्गावरील पूल तोडून मोकळे केले. अशातच बांधकाम देयकाअभावी आणि नंतर लॉकडाऊनमुळे काम रखडले. पावसाळा सुरू होणार तत्पूर्वी बांधकाम विभागाने ५० दिवसांच्या मुदतीत पुलांचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सुचना केल्या; मात्र कंत्राटदाराने कासवगतीने काम सुरू केले. मार्गावर तब्बल सात पूल होते. ते तोडण्यात आले. मात्र, रस्ता बांधकामात एकाही पुलाचे काम पूर्ण झाले नाही. आता कुठे वळण रस्ता निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
मात्र, या मार्गावरील नद्यांचा विचार केल्यास हे वळण रस्ते कुचकामी ठरणार असून आर्वी-तळेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडणार आहे. तसेच वर्धमनेरी, मांडला, जांब, रानवाडी आदी गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता असल्याने लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाने लक्ष देण्याची परिसरातील नागरिकांची आहे.

Web Title: Construction of Talegaon-Pulgaon road stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.