३५ गावांना दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:00 AM2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:07+5:30

जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषित पाणी यांची पाहणी करून संबंधीत ग्रा.पं.च्या हद्दीतील पाण्याचा दर्जा ठरविण्यात आला.

Contains contaminated water for 35 villages | ३५ गावांना दूषित पाणीपुरवठा

३५ गावांना दूषित पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ सर्र्वेेक्षणात उलगडले सत्य : ४८६ ग्रामपंचायतींना मिळाले ‘ग्रीन कार्ड’

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या जनजागृती तसेच दर सहा महिन्यांनी जलस्त्रोतांची करण्यात येणाऱ्या तपासणीमुळे आठ तालुक्यातील ३२ ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या ३५ गावांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तर १०५ जलस्त्रोत जोखीमग्रस्त असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषित पाणी यांची पाहणी करून संबंधीत ग्रा.पं.च्या हद्दीतील पाण्याचा दर्जा ठरविण्यात आला. पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रा.पं.ला लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात आले. ज्या ग्रा.पं.मध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, त्या ग्रा.पं.ला लाल, कमी दुषित पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ग्रा.पं.ला पिवळे, तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.ला हिरवे कार्ड देण्यात येते. विशेष म्हणजे ज्या ग्रा.पं.च्या हद्दीत चार वर्षांच्या कालावधीत एकदाही जलजन्य आजाराची नोंद झाली नाही त्या गावांना चंदेरी कार्ड देण्यात येते. वर्धा जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५१८ ग्रा.पं.च्या जलस्त्रोतांचे नुकतेच सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये कमी दूषित असणाऱ्या ३२ ग्रा.पं.ना पिवळे कार्ड देण्यात आले. तर ४८६ ग्रा.पं.ला हिरवे कार्ड देण्यात आले आहे. ऑक्टोंबर मान्सूनपश्चात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकाही ग्रा.पं.ला लालकार्ड मिळाले नाही. तर ३२ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

उद्योग उठले नागरिकांसह वन्यप्राण्यांच्या जीवावर
जिल्ह्यातील भूगाव, बरबडी, सेलूकाटे, इंझापूर, चितोडा, वरूड आदी गावांत विविध उद्योग समूह असल्याने या ग्रामपंचायतीअंतर्गत होणारा पाणीपुरवठा अतिदूषित आहे; पण आरोग्य पाणी पुरवठा विभागाकडून आरो प्लान्ट बसविण्यात आले आहे. तरीही औद्योगिक वसाहतींच्या प्रदूषणामुळे पिण्यायोग्य पाणी दूषित झाले आहे.
यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून वन्यप्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

आर.ओ. प्लान्ट उभारण्याची गरज
जिल्ह्यातील ३२ ग्रा.पं.अंतर्गत दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा होण्यासाठी आर. ओ. प्लान्ट बसविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे गरजेचे असून लोकसहभागातून आर.ओ. प्लान्ट बसविला जाऊ शकतो. त्यातही प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Contains contaminated water for 35 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.