मुख्यमंत्री दत्तक ग्राममध्ये दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:50 PM2018-01-07T23:50:02+5:302018-01-07T23:50:18+5:30

मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेत असलेल्या या गावात ग्रा.पं.च्या वेळकाढू धोरणामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे. काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाण्याकरिता भटकावे लागत आहे.

Contaminated water in Chief Minister Dattak Gram | मुख्यमंत्री दत्तक ग्राममध्ये दूषित पाणी

मुख्यमंत्री दत्तक ग्राममध्ये दूषित पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेत असलेल्या या गावात ग्रा.पं.च्या वेळकाढू धोरणामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे. काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाण्याकरिता भटकावे लागत आहे.
येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये १० दिवसांपासून सार्वजनिक नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सूचना देवूनही कोणत्याच हालचाली नाही. रविवारी काही ग्रामस्थ वॉर्डाचे सदस्य धनंजय थुल यांना भेटून सार्वजनिक नळातून जंतू असलेले दूषित पाणी येत असल्याची माहिती दिली. तसेच वॉर्ड क्र. २, ४ व १ मधील काही भागात सार्वजनिक नळाद्वारे अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याची ओरड आहे. पाणी कमी असल्यामुळे काहींनी तीन ते चार फुट खोलीचा खड्डा करून घरगुती नळ खाली उतरवला. पाणीपुरवठा करणारा कर्मचारी आरोग्याच्या सबबीखाली सुट्यांवर असून कामे प्रभावित होत आहे. वॉर्ड क्र. ५ मधील प्रशांत डोंगरी यांच्या घरामागील मोठ्या नाल्यातून ग्रा.पं.च्या घरगुती पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याची शंका उपस्थित होत आहे. तसेच सदर नाल्याची सफाई गत दीड ते दोन वर्षांपासून केली नसल्याचे वॉर्डातील रहिवासी माजी सरपंच मंगल गायकवाड व प्रशांत डोंगरे यांनी सांगितले. उन्हाळ्यापूर्वी गावात पाण्याचे योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी गावकऱ्यांची आहे.

बºयाच दिवसांपासून घरगुती नळाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाला कित्येकदा याबाबत सांगितले. माझ्या घरामागील नाला दोन वर्षापासून ग्रा.पं. सफाई कर्मचाऱ्यांकडून साफ करण्यात आला नाही. मागे एकदा साफ केला होता. परंतु नाल्यातील मलमा काढून तेथेच ठेवण्यात आला. मलम्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात येत नाही.
- मंगल गायकवाड, माजी सरपंच
नळाच्या पाण्यात नारू : काही भागात कृत्रिम पाणी टंचाई; नागरिकांची भटकंती
माझ्याकडे वॉर्डातील काही नागरिक आले होते. त्यांनी घरगुती नळाला दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. प्रशांत शेषराव डोंगरे यांच्या घरी जावून दूषित पाणी मी बघितले. सोमवारला ग्रा.पं.च्या सचिवांना याबाबत माहिती देणार आहे.
- धनंजय थुल, ग्रा.पं. सदस्य, वॉर्ड क्र. ५

Web Title: Contaminated water in Chief Minister Dattak Gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.