रासायनिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:54 PM2019-04-29T22:54:24+5:302019-04-29T22:54:40+5:30

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वीकारले.

Control the prices of chemical fertilizers | रासायनिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवा

रासायनिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवा

Next
ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वीकारले.
दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाच्या शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतमालाच्या किमती मात्र स्थिर आहेत. शेतीला लागणाऱ्या निविष्ठांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे.
खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पॉस मशीनचा प्रयोग राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सबसिडी चोरीला आळा बसला; मात्र दुसरीकडे खतांचे दर वाढविले आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांच्या किंमतीत वाढ केली आहे.
वर्धा जिल्ह्यात कापूस शेतीचे मोठे क्षेत्र असते. खताच्या एका बॅग मागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने प्रती एकरी एक ते दोन हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सरकारने दिलासा देण्याऐवजी खतांची दरवाढ केल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात नाराजी आहे.
१०.२६.२६ या खताची ५० किलोची बॅग १२३५ रुपयांत मिळायची, ती आता १३४० रुपये किमतीची घ्यावी लागणार आहे. १०५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. डीएपीच्या बॅगचे ११० रुपयांनी भाव वाढले आहे. १२.३२.१६ खताची बॅग १२४० रुपयींची होती. यात ११० रुपयाची वाढ झाली आहे.तर पोटॅश बॅगची २०० रुपयांनी किंमत वाढून ९०० रुपये झाले आहे. अन्य खतांच्या किंमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणून शेतकयांना दिलासा द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. काशीकर, राकेश पांडे, अमोल गेडाम, शुभम जळगावकर, मनीष भुजाडे, सागर घोडे, अक्षय पटेल, रोहित बैस, प्रेम मडावी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
नियोजन कोलमडण्याची भीती
तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवत आहेत. यंदाही दुष्काळी परिस्थिती आहे. रासायनिक खतांच्या भडकलेल्या किंमतींमुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. खरीप हंगामावरच शेतकरी वर्षभराचे नियोजन करतो. रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे नियोजन कोलमडून हाही हंगाम हातून जातो की काय, अशी भीती यावेळी शेतकºयांनी व्यक्त केली.

Web Title: Control the prices of chemical fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.