राजकारणातून अंतोरा गावात कलह

By admin | Published: September 21, 2015 01:58 AM2015-09-21T01:58:40+5:302015-09-21T01:58:40+5:30

अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते.

Controversy in the village of Endora from politics | राजकारणातून अंतोरा गावात कलह

राजकारणातून अंतोरा गावात कलह

Next

वातावरण कलुषित : खोट्या तक्रारीद्वारे केले होते ३० जणांवर गुन्हे दाखल
आष्टी (श.) : अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते. ग्रा.पं. निवडणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकाराची धग कायम असून गावात तणाव आहे.
गावातील राजकारणी, धनिक व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून भाजपाच्या ३० जणांवर ग्रा.पं. निवडणूक काळात गुन्हे दाखल केले. यातून गावाची शांतता भंग केली जात आहे. दारूबंदी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देशमुख व काही लोक हा प्रकार घडवून आणत असल्याचा आरोप राजेश ठाकरे यांनी केला आहे. खोट्या तक्रारी करून गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनातून केली.(प्रतिनिधी)

Web Title: Controversy in the village of Endora from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.