स्वच्छ शहरासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:07 AM2018-03-24T01:07:48+5:302018-03-24T01:07:48+5:30
स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन घंटा गाड्या स्थानिक न.प.ला प्राप्त झाल्या आहेत. त्याचा श्रीगणेशा खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
देवळी : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन घंटा गाड्या स्थानिक न.प.ला प्राप्त झाल्या आहेत. त्याचा श्रीगणेशा खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, नगरसेवक नंदू वैद्य, माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, अ. नईम, व आनंद सांंडे, धीरज फुलझेले, विवेक फडणवीस आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
न.प.ला प्राप्त झालेल्या घंटागाड्या व इतर सहा घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा गोळा करण्यात येणार आहे. यासाठी एकलव्य ट्रेडींग कंपनी कार्यरत आहे. सदर घंटागाड्या घरोघरी जावून कचरा संकलनाचे काम करतील. यामुळे घरातील कचरा थेट रस्त्याच्याकडेला येण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. नागरिकांनीही रस्त्यावर कचरा न टाकता न.प.च्या घंटागाडीत घरातील ओला व सुका कचरा टाकावा. या कचऱ्यातून खत निर्मिती केली जाणार आहे. परिक्षण समितीकडून खताची गुणवत्ता तपासल्यानंतर हे खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, असे यावेळी खा. तडस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाला अभियंता चारूबाला हरडे, आरोग्य निरीक्षक सुनील पुरी, किशोर चिंचपाने, सुनील खोंड, मुन्ना रोहणकर यांच्यासह देवळी न.प.च्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी न.प. कर्मचाºयांनी सहकार्य केले.