कोरोनाची साथ, मृत्यूदर रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:40 PM2020-08-19T15:40:04+5:302020-08-19T15:41:11+5:30

पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

With Corona, next month is crucial to preventing mortality | कोरोनाची साथ, मृत्यूदर रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा

कोरोनाची साथ, मृत्यूदर रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा

Next
ठळक मुद्देकोविड केअर सेंटरची जाणली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी वर्धा जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मी आज प्रत्यक्ष कोविड केअर सेंटरला भेट देऊन जाणून घेतली आहे. कोविड युद्धातील वर्धा जिल्ह्याचे आतापर्यंतचे काम समाधानकारक असले तरी पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. फडणवीस पुढे म्हणाले, कोविड संसर्ग रेशो नियंत्रणात आहे. सध्या तो ३ टक्क्यांवर असून आयसीएमआरने ५ टक्के आयडीयल रेशो म्हटला आहे. शिवाय १० टक्क्यांपर्यंत गृहीत धरला आहे. आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था वाढली आहे. चाचण्या वाढल्यावर रेशो कायम राहतो काय हे बघावे लागेल.

दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्या वेव्हज येत आहेत, त्या जर आपण बघितल्या तर वर्धेसारख्या ठिकाणी पुढील काही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणूनच पुढील महिना महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू दु:खद असून वर्धा जिल्ह्यात फारकाही मृत्यू झालेले नाहीत. मात्र, त्यालाही कसे नियंत्रणात ठेवता येईल याविषयी प्रभावी काम झाले पाहिजे. सेवाग्राम आणि सावंगी येथील वैद्यकीय महाविद्याल कोविड काळात उपयुक्त ठरत असले तरी भविष्याचे नियोजन केले पाहिजे, असे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.

सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयाचे काम उत्तम
विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या कोविड केअर युनिटला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयाच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. आरोग्य सभापती मृणाल माटे, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे मँनेजिंग ट्रस्टी परमानंद तापडिया, डॉ. बी. एस. गर्ग, डॉ. नितीन गगणे, डॉ. एस. पी. कलंत्री, गिरीश देव, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे आदींची उपस्थिती होती. फडणवीस यांनी ३० मिनिट थांबून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

Web Title: With Corona, next month is crucial to preventing mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.