CoronaVirus: वीज वितरण विभागाचे  आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:09 AM2020-07-05T09:09:27+5:302020-07-05T09:09:47+5:30

3 कर्मचारी हिंगणघाट (वय 55 पु, 29 पु, 30 पु, )तर दोन देवळी (50 पु ,40 पु.) तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

CoronaVirus: 5 more employees of power distribution department coronated | CoronaVirus: वीज वितरण विभागाचे  आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित

CoronaVirus: वीज वितरण विभागाचे  आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित

Next

वर्धा :-  चक्रीवादळामुळे  कोकणात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी आज कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यात 3 कर्मचारी हिंगणघाट (वय 55 पु, 29 पु, 30 पु, )तर दोन देवळी (50 पु ,40 पु.) तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

कोकणात चक्रीवादळामुळे  नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी 20 कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून गेले होते. परतल्यानंतर  त्यातील  3 कर्माचारी काल कोरोनाबाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील आज प्राप्त 12 अहवालात  5 व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत. तर 2 निगेटिव्ह आणि 5 अहवाल इन्कन्क्लुसिव्ह आहेत. यामध्ये 3 कर्मचारी हिंगणघाटमधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे.

हिंगणघाटमधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात तर देवळीमधील रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या रुग्णासहित जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 27 झाली असून त्यातील 12 कोरोनामुक्त तर 14 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus: 5 more employees of power distribution department coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.