CoronaVirus: खाकी वर्दीवाल्यांचं ‘ऑपरेशन कोरोना’; धार्मिक स्थळांमध्ये दडून बसलेल्यांची घेतली जातेय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 04:45 PM2020-04-05T16:45:10+5:302020-04-05T16:52:10+5:30

या घोषणेनंतर दिल्ली निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी ए-जमातच्या कार्यक्रमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे पुढे आले आहे.

CoronaVirus: Khaki 'Operation Corona'; Information is taken from those seated in religious places vrd | CoronaVirus: खाकी वर्दीवाल्यांचं ‘ऑपरेशन कोरोना’; धार्मिक स्थळांमध्ये दडून बसलेल्यांची घेतली जातेय माहिती

CoronaVirus: खाकी वर्दीवाल्यांचं ‘ऑपरेशन कोरोना’; धार्मिक स्थळांमध्ये दडून बसलेल्यांची घेतली जातेय माहिती

Next

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेऊन २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दिल्ली निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी ए-जमातच्या कार्यक्रमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पोलिसांनीही दक्षता म्हणून वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक स्थळांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन कोरोना’ असे नाव दिले असून धार्मिक स्थळांमध्ये कुणी दडून तर बसलेले नाही ना याची शहानिशा केली जात आहे.

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉक डाऊनची घोषणा केली. लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी कुठलेही धार्मिक, सांस्कृतिक व सामूहिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, नियमांना बगल देत दिल्लीत एक धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले व्यक्ती देशातील विविध भागात नियोजित ठिकाणी पोहोचले. सध्या संपूर्ण शासन व प्रशासनाची झोप उडाली आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसला तरी दक्षता म्हणून पोलिसांकडून जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक स्थळांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १२ धार्मिक स्थळांची पाहणी केली आहे. परंतु, कुणी तेथे चोरपावलांने आश्रय घेतल्याचे निदर्शनास आलेले नाही. कुठल्याही धार्मिक स्थळात कुणी चोरपावलांनी राहत असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
-----------
मंदिर, मशीद, गुरूद्वारा, चर्च आदी धार्मिक स्थळांमध्ये चोरपावलांनी कुणी आश्रय घेतला आहे काय याची शहानिशा करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ऑपरेशन कोरोना’ राबविल्या जात आहे. आतापर्यंत सुमारे १२ धार्मिक स्थळ तपासण्यात आली आहेत. कुठल्याही धार्मिक स्थळांमध्ये चोरीलनीने कुणी राहत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे.
- निलेश मोरे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

Web Title: CoronaVirus: Khaki 'Operation Corona'; Information is taken from those seated in religious places vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.