नोटाबंदीपेक्षा मानसिक बदलानेच भ्रष्टाचार मिटेल
By admin | Published: February 3, 2017 01:58 AM2017-02-03T01:58:16+5:302017-02-03T01:58:16+5:30
भ्रष्टाचार मिटविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयोग केले जातात. पण प्रत्येक नियम व कायद्यांना
वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सूर
वर्धा : भ्रष्टाचार मिटविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयोग केले जातात. पण प्रत्येक नियम व कायद्यांना भ्रष्टाचारी लोक पळवाटा काढून अधिक भ्रष्टाचार करताना दिसतात. भ्रष्टाचार मिटविण्यासाठी नोटाबंदी सारख्या उपाय फारसा प्रभाव पाडू शकत नाही. लोकांमध्ये मानसिक बदल घडविल्याशिवाय देशातील भ्रष्टाचार मिटणार नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेतून उमटला.
देशाच्या युवकांनी नोटाबंदीवर दोन्ही बाजूने मत व्यक्त केले. नोटाबंदी हा भ्रष्टाचार मिटविण्याचा उपाय आहे का, या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, निंबध वादविवाद परिसंवाद समितीचे अध्यक्ष प्रा. प्रमोद नारायणे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आशा अग्निहोत्री, प्रा. रविंद्र बेले, प्रा. उमाकांत डुकरे उपस्थित होते.
स्पर्धेत हर्षदा विरुळकर, संकेत बेलेकर, अक्षय नवघरे, राहुल नागपूरे, प्रगती भोजराज पुरी यांनी विषयाच्या बाजूने मते मांडली तर पल्लवी चंदनखेडे, अक्षरा ठाकरे, ओम धमाने, मृणाल डोळे, वंदन बोरकर, भूषण साळवे, निवेदिता फुसाटे, विशाल तेलंग यांनी विषयाच्या विरुद्ध बाजूने मते मांडले. वरिष्ठ विभागातून प्रथम क्रमांक अपेक्षा माथनकर, द्वितीय अक्षय नवघरे व तृतीय क्रमांक प्रगती पुरी आणि अक्षरा ठाकरे यांना विभागुन देण्यात आला. कनिष्ठ विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे निलोफर खान, सृष्टी कांबळी व तरुण शर्मा यांनी पटकाविला.
मार्गदर्शन करताना डॉ. आशा अग्निहोत्री यांनी भ्रष्टाचाराची कारणमीमांसा व त्यावरील उपाययोजना सांगितलया. प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले. संचालन नेहा दुबे यांनी तर आभार ज्ञानेंद्र मौर्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. विद्या शहाणे, रियाज शेख, भगवान गुजरकर यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)