रस्त्यावरच होतो कापसाचा लिलाव
By admin | Published: February 1, 2017 01:14 AM2017-02-01T01:14:34+5:302017-02-01T01:14:34+5:30
सेलू बाजार समितीत कापसाचा लिलाव रस्त्यावरच होत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या रस्त्याच्या
रस्त्यावरील गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा
घोराड : सेलू बाजार समितीत कापसाचा लिलाव रस्त्यावरच होत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असल्याने येथे वाहतुकीचा खोेळंबा होतो. या बाबत बाजार समितीला विचारणा केली असता त्यांच्याकडून सदर जागा समितीच्या मालकीचीच असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्त्यावरील लिलावामुळे अडचणी निर्माण होत असून लक्ष देण्याची मागणी आहे.
रस्त्यावर नाही तर कुठे लिलाव करावा, लिलाव होत असलेली जागा बाजार समितीची आहे.
- आय.आय. सुफी, सचिव, सिंदी कृ.उ.बा. समिती, सिंदी
पूर्वी कापसाचा लिलाव होत नसल्याने योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे ही पद्धत आम्ही सुरू केली आहे. लिलाव रस्त्यावर होवू नये यासाठी बैल बाजार भरतो त्या जागेवर करण्याचा विचार सुरू आहे.
- रामकृष्ण उमाटे, उपसभापती, सिंदी कृ.उ.बा. समिती.