वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटने कापसाच्या गाठीला लागली आग; दहा लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:07 PM2020-05-06T19:07:49+5:302020-05-06T19:08:14+5:30

कापसाच्या गाठीच्या प्रेसिंगची प्रक्रिया सुरू असताना शॉर्टसर्किटची ठिणगी उडाल्याने कापसाच्या 32 गाठी आणि इलेक्ट्रिक युनिट जळाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता येथील देऊरवाडा मार्गावरील आशीर्वाद कॉटेज येथे घडली.

Cotton caught fire due to short circuit in Wardha district; Loss of ten lakhs | वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटने कापसाच्या गाठीला लागली आग; दहा लाखाचे नुकसान

वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटने कापसाच्या गाठीला लागली आग; दहा लाखाचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कापसाच्या गाठीच्या प्रेसिंगची प्रक्रिया सुरू असताना शॉर्टसर्किटची ठिणगी उडाल्याने कापसाच्या 32 गाठी आणि इलेक्ट्रिक युनिट जळाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता येथील देऊरवाडा मार्गावरील आशीर्वाद कॉटेज येथे घडली.
शॉर्टसर्किटने आग लागल्याबरोबर ही आग नगरपालिका प्रशासनाच्या अग्निशामन दलाने आणि तेथील उपलब्ध असलेल्या पाण्याने आटोक्यात आणण्यात आली
या घटनेची माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण व पोलीस प्रशासनाला देण्यात आली रात्रीच अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली फौजदार गोपाल ढोले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला
येथील आशीर्वाद कोटेक्स जिनिंग प्रेसिंग ला काल शॉर्टसर्कित ने संध्याकाळी 7 च्या दरम्यान अचानक आग लागली संचालक विजेंद्र मोटवानी यांनी या शॉर्टसर्किट मध्ये दहा लाखाचे अंदाजे नुकसान झाल्याची माहिती दिली बाजूलाच एक हजार क्विंटल कापूस असून तो थोडक्यात कामगार कर्मचारी यांच्या प्रसंगावधानाने वाचला अन्यथा मोठी हानी झाली असती अशी माहिती लोकमतला दिली.

Web Title: Cotton caught fire due to short circuit in Wardha district; Loss of ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग