शेतकºयांचा कापूस शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:54 PM2017-10-29T23:54:16+5:302017-10-29T23:54:30+5:30

सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे.

In the cotton field of farmers | शेतकºयांचा कापूस शेतातच

शेतकºयांचा कापूस शेतातच

Next
ठळक मुद्देदर तर नाहीच;मजुरीही कंबर मोडणारीच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस वेचून तो बाजारात विकाचा अशी प्रत्येक शेतकºयाची इच्छा आहे़; पण मजुरच मिळत नसल्याने त्यांची ही अपेक्षा हवेतच विरत आहे. मजुरांअभावी शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच पडून असल्याचे दिसत आहे.
यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांची मोड झाली. त्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी पडली. सरकीला कोंंबे फुटली. यामुळे शेतकºयाचे चांगलेच नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर येते येवू लागला आहे. हा वेचण्याची तयारी कापूस उत्पादकांकडून होवू लागली असताना शेतकºयांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे.
साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यंदा याला थोडा विलंब होईल असे वाटत होते. पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पºहाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे. मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजुरच मिळत नसल्याने शेतकºयांची चांगलीव गोची झाली आहे.
काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकºयांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसनू आले आहे.

वाढीव मजुरीसह ने-आण करण्याचाही खर्च
शेतमजुरांच्या मजुरीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तुलनेत दर मात्र कमी आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंतेत असताना यात आणखी भर म्हणते मजुरांना ने आण करण्याचा खर्चही त्यांनाच करावा लागत आहे. परिणामी शेतकºयाच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकºयांच्या शेतात अजूनही सितदहीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढ
वर्धा जिल्ह्यात गत वर्षी ५ ते साडेपाच रुपये किलो वेचणीचा दर आता ९ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरिता ७०० ते ९०० रुपयांचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणाºया शेतकºयांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांना हा दर देणे शक्य आहे. पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाककुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.

Web Title: In the cotton field of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.