वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादक हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:44 PM2020-05-02T18:44:11+5:302020-05-02T18:44:33+5:30

विदर्भातील पांढऱ्या सोन्याची शासकीय खरेदी नसल्याने उत्पादक हवालदील झाला आहे. खासगीमध्ये कवडीमोल भावाने कापूस विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.

cotton grower in Wardha district in crisis | वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादक हवालदील

वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादक हवालदील

Next
ठळक मुद्देपांढऱ्या सोन्याला कवडीमोलाचा भाव


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: विदर्भातील पांढऱ्या सोन्याची शासकीय खरेदी नसल्याने उत्पादक हवालदील झाला आहे. खासगीमध्ये कवडीमोल भावाने कापूस विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. आता कसे जगावे आणि येत्या हंगामाचे नियोजन कसे करावे या विवंचनेत शेतकरीवर्ग आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थांबले आहेत. कापूस आणि धान्य घरात ठेवून भाव वाढेल व खरेदी होऊन चार पैसे मिळतील या आशेवर शेतकरी होता. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात ४० ते ५० टक्के कापूस भरून ठेवलेला आहे.
तालुक्याप्रमाणे नोंदणी करा अशा सूचना मिळाल्याने शेतकरी ऑनलाईनच्या कामात गुंतले. नोंदणी झाली मात्र खरेदी सुरू झाली नाही. घरात कापूस ठेवणे अडचणीचे व अनारोग्याचे ठरू लागल्याने खासगी जिनींग व व्यापाºयांकडे विकायला सुरूवात झाली.
त्यामुळे जगाचा पोशिंदा आणि पांढरे सोने पिकविणारा शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.पुढे हंगाम असल्याने संकट आणखी वाढले आहे.

घरात आणि गावात बहुतांश लोकांकडे कापूस शिल्लक आहे. शासकीय खरेदी होईल अशी आशा होती पण नुकसानीचा सामना करावा लागत आहे....

गणेश कोचे

काही खरे नाही. कापूस, धान्य घरातच ठेवून आहे. जिनिंग वा खाजगी विक्री परवडत नाही. कापसाचे वजन कमी झाले. खाज सुटत असल्याने घरात ठेवणे धोक्याचे झाले आहे. सीसीआयची खरेदी परवडणारी असली तरी आता मात्र मार्ग नसल्याचे दिसत आहे....

प्रमोद चव्हाण, वरूड रे.

Web Title: cotton grower in Wardha district in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस