कापसाला दिला ४ हजार ६०८ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:53 AM2017-11-10T00:53:57+5:302017-11-10T00:54:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाम (चौरस्ता) येथील श्रीवास जिनिंग प्रेसिंगमध्ये कनक अॅग्रोतर्फे यावर्षीच्या खरेदीचा शुभारंभ हिंगणघाट कृउबास सभापती अॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कापसाला प्रती क्विंटल ४ हजार ६०८ रुपये भाव देण्यात आला. प्रथम आलेल्या शेतकºयांचा सन्मान केला.
प्रथम गाडी मालक रामदास सोनेकर किन्हाळा यांचा सत्कार अॅड. कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमोद अवचट यांचा सत्कार उपाध्यक्ष मनीष निखाडे, वाघेडाचे सुरेश जिवतोडे यांचा सत्कार संचालक अशोक वांदिले, जामचे सुनील सराटे यांचा सत्कार खविसचे संचालक शांतीलाल गांधी, किनगावचे संदीप बाळसराफ यांचा संचालक अभय कोठारी यांनी सत्कार केला. प्रथम आलेल्या बैलबंडी मालक कचरू म्हस्के, राजेंद्र म्हस्के, यशवंत निवटे, दौलत म्हस्के, बाळा सोमकुंवर यांचा संचालक महेश झोटींग, जनार्दन हुलके, गणेश वैरागडे, अभय कोठारी, गजानन शेंडे यांनी सत्कार केला. आज सुमारे ५०० क्विंटल कापसाची आवक झाली. कार्यक्रमाला संचालक गंगाधर हिवंज, अभय कोठारी, भोजराज दळणे, खविसचे संचालक शालीक वैद्य, केशव भोले, प्रशांत बोरकुटे, वामन डंभारे, विनोद पिसे, हरिभाऊ बोबले, रोशन मून, भारत भोयर, कवडू मुडे, शांतीलाल गांधी, प्रवीण पटेलीया, नरेश राका, दिलीप कटारिया, अजित कोठारी, खुशाल लोहकरे, राधेश्याम श्रीवास, सुरेश भगत, अभय कोठारी, अडते हरदास, वामन बाभुळकर, धनंजय शेंडे, सचिन दोंदल, राजेंद्र चंदनखेडे, अभय लोहकरे, अमित कोठारी, पांडुरंग बादले, वासुदेव देवडे, दादा सावरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला सचिव शंकर धोटे, लक्ष्मण वांदिले, राजू काळमेघ, जनार्दन राऊत, दिलीप चौधरी, गजानन झाडे आदींनी सहकार्य केले. संचालन अभिषेक कोठारी यांनी केले तर आभार आदित्य कोठारी यांनी मानले.