कापसाचे भाव ६ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:00 AM2019-03-20T00:00:04+5:302019-03-20T00:00:25+5:30
मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आली आहे. त्यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रांवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाची आवकही वाढली आहे. सध्या सहा हजारांच्यावर कापसाला भाव मिळत असून या भाववाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आली आहे. त्यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रांवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाची आवकही वाढली आहे. सध्या सहा हजारांच्यावर कापसाला भाव मिळत असून या भाववाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
कापसाचे भाव सहा हजारावर पोहचल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात कापसाची आवक वाढली आहे. मागील पंधरवाड्यात कापसाच्या भावात मोठी घसरण सुरू होती. त्यामुळे आर्वीच्या बाजारापेठेत कापसाची आवक मंदावली होती; पण गेल्या चार-पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी आली. शिवाय दर सहा हजारावर पोहचले. आतापर्यंत आर्वी बाजारात १ लाख ७ हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ हजार ९६ क्विंटल तूर, ६ हजार ५०४ क्विंटल चना आणि ५० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. कापसाच्या भावात अचानक तेजी आल्याने खाजगी कापसाची आवक सध्या जोरात सुरू आहे. यात पहिल्या व चांगल्या प्रतीच्या कापसाला ६ हजार रूपये तर फरतड कापसाला ४,४०० ते ४,५०० रूपये खाजगी बाजारात भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना भाव वाढण्याची प्रतीक्षा होती. या प्रतीक्षेनंतर भावात तेजी आल्याने शेतकºयांनी खासगी बाजारात कापूस विक्रीसाठी आणणे सुरू केले आहे.
सेलूत ५ हजार ९७५ रूपये भाव
घोराड- मंगळवारी सेलू येथे ५ हजार ५०० ते ५ हजार ९७५ रूपयावर भाव स्थिरावले. सर्वाधिक कापूस ५ हजार ५००, ५ हजार ७०० या भावात व्यापाºयांनी खरेदी केला. सेलू येथे लिलाव पध्दतीने कापूस खरेदी केली जाते. त्यानुसार शेतकºयांना भाव दिला जात आहे. त्यामुळे या भावात चढउतार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
गेल्या चार-पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी आली असून कापसाचा भाव सहा हजारावर गेला आहे. शेतकºयांनी या वाढलेल्या भावाचा लाभ घ्यावा.
- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.