सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 04:00 AM2020-04-29T04:00:00+5:302020-04-29T04:00:02+5:30

महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिकारी यांच्याकडे वळविण्यात व्यापाऱ्यांना यश आले. इतर ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली.

Cotton from Selu taluka goes to Arvi | सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे

सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे

Next
ठळक मुद्देकापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची भटकंती : कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : कापसाची उलंगवाडी झाली आणि कापूस विक्रीस नेण्याच्या बेतात शेतकरी असताना कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. सेलू येथील बाजारपेठेत कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने आता कापूस विक्रीसाठी भटकंती करत बाजारपेठ शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिकारी यांच्याकडे वळविण्यात व्यापाऱ्यांना यश आले. इतर ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली.
त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे घरात असलेला कापूस विक्री करणे, हा एकमेव पर्याय आहे. आता शेतकºयांनी घरात असलेला कापूस गाड्या भरून तालुक्यातील बाजारपेठेत नाही तर दुसऱ्या बाजारपेठेत का होईना म्हणून विक्रीस काढला आहे.
सेलू तालुक्यातील कापूस पाच वर्षांपूर्वी आर्वीच्या दिशेने जात होता. बाजार समितीने हा कापूस सेलू बाजारपेठेतच विकला जावा म्हणून उपाययोजना केल्या होत्या.
आता पुन्हा शेतकऱ्याला जवळचे सोडून दूरच्याचा हात पकडण्याची वेळ आली आहे. शासनाची कापूस खरेदी बंद आहे. अशातच व्यापाºयांनी हात वर केले आहे. तालुक्यातील जवळपास ८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

सेलूची बाजारपेठ सुरू करा
सेलू ही कापसाची मोठी बाजारपेठ आहे. लांब धाग्याचा कापूस पिकविणाऱ्या तालुक्यात सेलूचा समावेश होतो. येथील कापूस खरेदी बंद राहावी, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बाजार समितीचा बुडतोय सेस
सेलू तालुक्याला लागूनच आर्वी तालुका आहे. येथे कापूस खरेदी केंद्रे सुरू झाली. त्यामुळे खरांगणा ते आर्वी येथे असलेल्या जिनिंगमध्ये या परिसरातील कापूस आता विक्रीला जाताना दिसत आहे. यामुळे सेलू बाजार समितीला मिळणाऱ्या सेसला मुकावे लागणार आहे.

शेतकरी संघटनेचे आगळेवेगळे कापूस कैफीयत आंदोलन
चिकणी (जामणी) : २० एप्रिल पासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली; मात्र एका दिवशी २० गाड्या घेतल्या जात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण झाले. सीसीआय केवळ एफएक्यू ग्रेडचा कापूस घेत आहे. नॉन एफएक्यू कापूस घेत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने शेतकऱ्यांचा पूर्णच कापूस घ्यावा, याकरीता शेतकरी संघटना ३० एप्रिलला आगळेवेगळे कापूस कैफीयत आंदोलन करीत असल्याची माहिती शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्याध्यक्ष सतीश दाणी यांनी लोकमतला दिली. आंदोलन प्रत्येकाने आपापल्या घरूनच करायचे असून यामध्ये केवळ संबंधित प्रतिनिधींना मेसेज अथवा संपर्क करावा, असे ते म्हणाले.

Web Title: Cotton from Selu taluka goes to Arvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस