कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:28 PM2018-12-27T22:28:25+5:302018-12-27T22:28:42+5:30

गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.

Cotton slowdown; Farmer concerned | कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

Next
ठळक मुद्देपाच हजार चारशे रूपयावर दर स्थिरावला

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.
अपुरा पाऊस व बोंडअळी या कारणामुळे आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही. याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर झाला तर तालुक्यातील बहुतांश: शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या धास्तीने कपाशी पीके उपटून चना व गहू पेरणे पसंत केले. यामुळे यावर्षीचा कापूस हंगाम तोट्याचा ठरून जानेवारी महिन्यातच कापसाची उलगंवाडी होणार असल्याचे चित्र आहे. तर कोरडवाहू कपाशी उत्पादकांना यावर्षी मोठा फटका सहन करावा लागला असल्याचे चित्र आहे. आधीच कापसाचे उत्पादन कमी, त्यावर मजूराचा होणारा खर्च अधिक असूनही गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून सध्या हा भाव पाच हजार चारशेवर गेल्या एक आठवड्यापासून स्थिरावला आहे. कापसाच्या भावाची होणारी घसरण ही शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.
आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे. यात कापूस पिकावा का नाही? या फेºयात सध्या शेतकरी सापडला आहे. सध्या तरी हे कापसाच्या भावाच्या मंदीचे सावट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. नापिकी व कमी पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम आर्थिक फटका देणारे ठरले आहे. बोंडअळी व पावसाचा मोठा ताण हे दोन घटक कापूस उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मारक ठरले आहे. त्यात एकरी चार ते पाच क्विंटलचा फटका बसल्याचे कापसाचे उत्पादन अर्ध्यावरं आहे. गेल्या तीन वर्षापासून नापिकी व नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाची कापसाची स्थिती पाहता दीडपट भाव कधी देणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
कापूस शेतकऱ्यांच्या घरातच
यावर्षी कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या भागात एकरी ८ क्ंिक्टल उत्पादन झाले. कापसाचे भाव वाढतील अशी आशा असतांना भाव ५४०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. भाव सहा हजारांवर जाईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस बाजारात विकण्यासाठी आणलेला नाही. कापूस घरीच भरून ठेवला आहे. जानेवारीपर्यंत शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहणार आहे असे चित्र दिसून येत आहे. कापूस बाजारातही आवक मंदावलेली असल्याचे दिसते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीचे भाव पडल्याने कापसाच्या भावात मंदी आली आहे. अजून काही दिवस हीच परिस्थिती कामय राहणार आहे.
- मोन्टू चांडक, कापूस व्यापारी, आर्वी.

Web Title: Cotton slowdown; Farmer concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.