बोंडअळीच्या सावटातही कपाशीचा पेरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:02 AM2018-08-02T00:02:21+5:302018-08-02T00:03:03+5:30

गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे वाढलेल्या क्षेत्रावरून दिसून येत आहे.

Cotton soda increased in the bowl shade | बोंडअळीच्या सावटातही कपाशीचा पेरा वाढला

बोंडअळीच्या सावटातही कपाशीचा पेरा वाढला

Next
ठळक मुद्दे९९.५० टक्के पेरणी पूर्ण : सोयाबीनचे क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे वाढलेल्या क्षेत्रावरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत ९९.५० टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. खरीप २०१८-१९ मध्ये २ लाख ४ हजार २०३ क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. नियोजित क्षेत्र २ लाख २६ हजार ३६३ निश्चित करण्यात आले होते. आर्वी तालुक्यात २४ हजार ७९८, आष्टी तालुक्यात १० हजार ७८४, कारंजा तालुक्यात २३ हजार ९१०, वर्धा तालुक्यात २९ हजार २००, सेलू तालुक्यात २७ हजार ७५, देवळी तालुक्यात २८ हजार ६४६, हिंगणघाट तालुक्यात ४३ हजार ३९८, समुद्रपूर तालुक्यात ३८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. एकूण कपाशीचे क्षेत्र २ लाख २५ हजार २२९ हेक्टर असून आतापर्यंत ९९.५० टक्के हेक्टरवर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीवर रोग आल्याने उत्पादनात घट झाली होती. तसेच किडीमुळे कापूस वेचणीच्या कामावर महिला मजूर येण्यास तयार होत नव्हते. यामुळे गावाबाहेरून मजूर बोलावून अनेक शेतकºयांनी कापसाची वेचणी केली. क्विंटलमागे किमान ६०० रुपये अतिरिक्त खर्च शेतकºयांना कापूस वेचणीसाठी आला. कापसाचा भाव ५ हजार ५०० च्या वर गेला नाही. त्यामुळे कापूस शेती तोट्यात राहिली. यंदाही किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे कृषी विभागाने उन्हाळ्यातच जाहीर केले असतानाही कापूस क्षेत्र खरीप घटलेले नाही. कापसाचा पेरा वाढलेलाच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनही मोठ्या प्रमाणावर होते. यंदामात्र सोयाबीनचे क्षेत्र घटल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे नियोजन क्षेत्र १ लाख १७ हजार निश्चित करण्यात आले होते. आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७, आष्टी ८ हजार ६७४, कारंजात १२ हजार १५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ७ हजार ९७०, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १४ हजार ८५६, समुद्रपूर २० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत ९५.७६ टक्के लागवड पूर्ण झाली. सोयाबीनकडे वळलेला शेतकरी गतवर्षी कापूस पिकाकडे होता. यंदा हे क्षेत्र घटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविली जात होती. मात्र, कापसाचा पेरा कमी झाल्याचे दिसून येत नाही.
निवडणुकीच्या वर्षात दरवाढीची आशा
२०१९ हे देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे कापसाला निश्चितपणे जादा भाव ठेवण्यासाठी सरकारी धोरण कारणीभूत ठरतील. अशी आशा शेतकºयांना आहे. त्यामुळे हमी भाव लक्षात घेऊन शेतकºयांनी कापूस पेरणीकडे आपला कल दाखविला आहे. तसेच राज्य सरकार कापूस उत्पादकांना काही सवलतीच्या योजना देतील त्यामुळे भाव वाढेल, अशी आशा असल्याने कापसाचा पेरा वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Cotton soda increased in the bowl shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.