तहसीलदारांना दिले कपाशीचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:14+5:30
यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन व कपाशीचे झाड तहसीलदार सचिन कुमावत यांना दिले.
यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच जमिनीची योग्य मशागत न झाल्याने पिकांचीही वाढ खुंटत फुल व फळधारणा कमी झाली आहे. अशातच परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून भरीव शासकीय मदत जाहीर झालेली नाही. ढगाळी वातावरण व पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर फळ शेती करणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. सध्या कपाशीचे बोंड सडत असून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सर्व शेतकºयांना प्रति हेक्टर सरसकट २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आ. दादाराव केचे, मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जि. पं. सदस्य श्वेता धोटे, सरीता गाखरे, सुरेश खवशी, सभापती निता गजाम यांच्यासह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कपाशीवर लाल्या अन् बोंडअळीचाही प्रादुर्भाव
परतीच्या पावसामुळे कपाशी पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात अखेरीस झालेल्या परतीच्या पावसानंतरही जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहिल्याने सध्या गुलाबी बोंडअळी तसेच लाल्याचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.