बनावट नोटा बाळगणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:25 PM2019-04-06T23:25:29+5:302019-04-06T23:27:30+5:30

येथे बनावटी नोट चालवून व्यावसायिकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल २१ बनावट नोटा जप्त केल्या आहे.

Counterfeit marker | बनावट नोटा बाळगणारा जेरबंद

बनावट नोटा बाळगणारा जेरबंद

Next
ठळक मुद्दे५०० रुपयांच्या २१ नोटा जप्त : समुद्रपूर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथे बनावटी नोट चालवून व्यावसायिकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला समुद्रपूर पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल २१ बनावट नोटा जप्त केल्या आहे. सदर आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, ५०० रूपयाच्या नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजु भास्कर इंगोले (३२) रा. नांदोरा (डफरे) ता. देवळी जि. वर्धा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सदर आरोपीने शुक्रवारी रात्री नवनीत गंगशेट्टीवार यांच्या दुकानात येत हळदीचे दोन पाकिट खरेदी केले. त्यावेळी त्याने व्यावसायिकाला ५०० रुपयांची नोट दिली. त्यानंतर उर्वरित पैसे घेवून आरोपीने तेथून यशस्वी पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटातच सदर नोट बनावट असल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याचीही भांबेरी उडाली होती.
दरम्यान व्यापाºयाने आरोपीचा शोध घेवून सदर नोट बदलवून घेतली. त्यानंतर सदर व्यापाºयाने आरोपीजवळ पेढ्याचा डबा दिसल्याने मिठाई विकेत्याचे दुकान गाठून तुम्हाला सदर व्यक्तीने कुठली नोट दिली याची विचारणा केली. सदर नोट बघितल्यावर तीसुद्धा बनावट असल्याचे पुढे आले. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या सहकार्याने सदर आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी त्याच्याजवळून एकाच नंबरच्या सहा तर वाहनात ठेऊन असलेल्या एकाच नंबरच्या १५ नोटा जप्त केल्या आहे. पोलिसांच्या अधिक चौकशीत सदर आरोपीने यापूर्वी मध्य प्रदेशातही अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, अरविंद येनुरकर यांनी केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Counterfeit marker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.