सैनिकांच्या समर्पणावरच देश जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 10:23 PM2019-06-01T22:23:47+5:302019-06-01T22:24:20+5:30

आज देशात दहशतवाद, हिंसाचार वाढत आहे. देशाच्या सीमेवर देखील आज असुरक्षिततेचे वातावरण आहे. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारताचा जवान देशाचे रक्षण करीत आहे. परंतु, आपण त्याचा कधीच विचार करीत नाही. आपले आईवडील, मुलं-बाळ परिवार सोडून तो देशाच पर्यायाने आपले रक्षण करीत आहे.

The country is living on the commitment of the soldier | सैनिकांच्या समर्पणावरच देश जिवंत

सैनिकांच्या समर्पणावरच देश जिवंत

Next
ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ । पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारात शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : आज देशात दहशतवाद, हिंसाचार वाढत आहे. देशाच्या सीमेवर देखील आज असुरक्षिततेचे वातावरण आहे. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारताचा जवान देशाचे रक्षण करीत आहे. परंतु, आपण त्याचा कधीच विचार करीत नाही. आपले आईवडील, मुलं-बाळ परिवार सोडून तो देशाच पर्यायाने आपले रक्षण करीत आहे. या सैनिकांच्या समर्पणावरच देश जिवंत आहे, असे विचार अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडारात ३१ मे २०१६ रोजी झालेल्या अग्निस्फोटातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.
शहीद दिन समारोह समितीद्वारे स्थानिक आर. के. हायस्कूलच्या शहीद स्मृती मंचावर आयोजित तिसऱ्या ‘एक शाम शहीदों के नाम’ या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, दारूगोळा भांडाराचे ले. कर्नल सिन्हा, ले. कर्नल सुमित शर्मा, ले. कर्नल पंकज शुक्ला, आर.के. हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष मोहन अग्रवाल, समारोह समितीचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, माजी सभापती मिलिंद भेंडे, सरपंच नीलिमा राऊत, पंंं.स. सदस्य दिलीप अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार कडू यांनी सैनिकांचा दर्जा श्रेष्ठ असल्याचे सांगितले. रामदास तडस म्हणाले, मे २०१६ ची ती काळरात्र माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून मी या घटनेत शहीद झालेल्या सर्वच वीरांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. शहीद परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी शहीद स्मारकास मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहून मानवंदना दिली. कार्यक्रमात पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेले मलकापूर येथील संजय व नितीन हाडगे या शहीद परिवाराचा मार्इंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गडचिरोली येथील शहीद परिवारांनी मार्इंच्या छत्रछायेत असणाºया अनाथांच्या पालन-पोषणासाठी निधी गोळा करून मार्इंच्या स्वाधीन केला.
अंध विद्यालयाने ‘एक शाम शहीदों के नाम’ कार्यक्रमातून देशभक्तीपर विविध गाणी सादर केली. या कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रातील शहीद परिवार सहभागी झाले होते. तर वर्धा येथील गोविंद व श्रीकांत राठी यांनी पुलवामा शहीद संजय राजपूत व नितीन हाडगे यांच्या परिवारास प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश देऊन सामाजिक बांधीलकीचा परिचय दिला. प्रास्ताविकातून समितीचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. आयोजनात इंडियन मिलिटरी स्कूलच्या भावी सैनिकांचे मोठे योगदान होते. कार्यक्रमाला शहरवासींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार
गडचिरोली येथे भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या अमृत बदाडे, साहुराज मडावी, प्रमोद भोयर, राजू गायकवाड, अभिमान रहाटे, किशोर बोभाटे, संजय खरडे, संतोष चव्हाण, दयानंतद दारोडे, रूपेश वालोदे, युगांदी मडावी या शहीद कुटुंबीयांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, साडी, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी एका शहीद पुत्रास हृदयाशी लावून वात्सल्याचा हात ठेवून त्याचा पापा घेतला, तेव्हा काही काळ वातावरण भावविभोर झाले होते.

Web Title: The country is living on the commitment of the soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक