देश अघोषित आणीबाणीच्या सावटाखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:57 PM2018-10-23T23:57:25+5:302018-10-23T23:58:14+5:30

या देशात दीर्घकाळ टिकून रहायचे असेल तर देशातील लोकशाहीच संपुष्टात आणली पाहिजे. या दिशेने सध्या मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या बाजूने रहाल तर लाभ मिळेल आणि विरोधात जाल तर घरादारावर छापे पडतील, याची जाणीव सरकार वारंवार करून देत आहे.

The country is under undeclared emergency | देश अघोषित आणीबाणीच्या सावटाखालीच

देश अघोषित आणीबाणीच्या सावटाखालीच

Next
ठळक मुद्देपुण्यप्रसून वाजपेयी : दिनकरराव मेघे स्मृति व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : या देशात दीर्घकाळ टिकून रहायचे असेल तर देशातील लोकशाहीच संपुष्टात आणली पाहिजे. या दिशेने सध्या मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या बाजूने रहाल तर लाभ मिळेल आणि विरोधात जाल तर घरादारावर छापे पडतील, याची जाणीव सरकार वारंवार करून देत आहे. देशावर अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे, मात्र त्याविरूद्ध कुणीच बोलत नाही, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार व वृत्तविश्लेषक पुण्यप्रसून वाजपेयी यांनी व्यक्त केली. प्राचार्य दिनकरराव मेघे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित बाराव्या व्याख्यानमालेत पुण्यप्रसून वाजपेयी यांनी ‘प्रसार माध्यमांची भूमिका आणि लोकतंत्र’ या विषयाची मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रकाश दुबे होते. मंचावर ज्येष्ठ विधीज्ञ एन.एन. ठेंगरे, सविता मेघे, श्रीकांत बारहाते, निलीमा भट्टाचार्य यांची उपस्थिती होती.
नवे सरकार सत्तेत आले की त्याला काम करण्यासाठी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा समंजसपणा निश्चितच प्रसार माध्यमांमध्ये असतो. मात्र, हा कालावधी तरी किती असावा? सरकार पोकळ बाता करणार असेल तर माध्यमांना आपली भूमिका बजावणे क्रमप्राप्त आहे. मात्र, आता सरकारविरूद्ध बोलणाऱ्या माध्यमांचीच मुस्कटदाबी सुरू झाली आहे, असे वाजपेयी म्हणाले. सरकारच्या राजकीय भूमिकांची तटस्थ चिकित्सा करण्याचे सामर्थ्य प्रसार माध्यमांमध्ये आहे. मात्र, आम्ही तुम्हाला नफा मिळवून देतो, पण तुम्ही आमचेच गुणगान करायचे, अशी थेट अंमलबजावणी या सरकारने सुरू केली. असे ही वाजपेयी याप्रसंगी म्हणाले.
या कार्यक्रमात माज खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते पुण्यप्रसून वाजपेयी व प्रकाश दुबे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत बारहाते यांनी केले. संचालन नीलिमा भट्टाचार्य मेघे यानी केले. प्रारंभी प्राचार्य मेघे यांचे जीवनकार्य चित्रफितीतून मांडण्यात आले. अतिथींचे स्वागत अ‍ॅड. प्रकाश मेघे, प्रा. किरण मेघे, शुभदा रूद्रकार व प्रा. राजेश बाळसराफ यांनी केले. आभार डॉ. अभ्युदय मेघे यांनी मानले.

Web Title: The country is under undeclared emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.