साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण-तरुणीला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:01 PM2018-11-26T22:01:39+5:302018-11-26T22:01:53+5:30

बाल वयापासूनच मुलामुलींना प्रशिक्षण दिले पाहिजे. आतंकवाद, दहशतवाद, हिंसात्मक वृत्ती हद्दपार करण्यासाठी तरुण-तरुणींना साहसी बनविले पाहिजे. जेणे करुन देशासमोर येणारे कोणतेही संकट सहजपणे टाळता येवू शकते. यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

Courage training is essential for every young person and young woman | साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण-तरुणीला आवश्यक

साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण-तरुणीला आवश्यक

Next
ठळक मुद्देरामदास तडस : एक दिवसीय बाल महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बाल वयापासूनच मुलामुलींना प्रशिक्षण दिले पाहिजे. आतंकवाद, दहशतवाद, हिंसात्मक वृत्ती हद्दपार करण्यासाठी तरुण-तरुणींना साहसी बनविले पाहिजे. जेणे करुन देशासमोर येणारे कोणतेही संकट सहजपणे टाळता येवू शकते. यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
अ‍ॅडव्हेंचर हिलर्स, कब बुलबुल बाल महोत्सव व आपत्ती व्यवस्थापन दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आय. टी. आय. टेकडीवर उभारलेल्या एडव्हेंचर हिल्स येथे स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था व वर्धा भारत स्काऊट आणि गाईड यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार रामदास तडस उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारवणकर, चैताली राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के, महेश मोकळकर, शकुंतला चौधरी, सहा. राज्य आयुक्त आर.आर. जयस्वाल, हरीश इथापे, डॉ. राजेंद्र बोरकर, मुरलीधर बेलखोडे,प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, पोलीस निरीक्षक अशोक चौधरी, प्राचार्य मदन मोहता, प्राचार्य खुशाल मून, राम बाचले, रेणुका भोयर, क्रीडा संकुलचे व्यवस्थापक रवि काकडे, आर्किटेक्ट नयन निस्ताने, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, निर्मला नादुरकर, राज्य मंडळ प्रतिनिधी भरतकुमार सोनटक्के, दत्तराज भिष्णूरकर, वडाळकर, मुख्याध्यापक व एडव्हेंचर हिल्स प्रकल्पाचे प्रमुख तथा स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. मुलांना बालपणापासून साहसी उपक्रमांत सहभागी करणे गरजेचे आहे. हा हेतु समोर ठेवून प्रगत राष्ट्रात २ वर्ष सैनिकी प्रशिक्षण आवश्यक केलेले आहे. अशाच प्रकारच्या प्रशिक्षणाची आपल्याही देशात गरज आहे. असे प्रतिपादन अतुल तराळे यांनी केले. तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले युवा पिढीसाठी अडथळा पार प्रशिक्षण आवश्यक केल्यास उंच मनोबल असलेले व सैनिकी मानसिकता असलेले भावी नागरिक देशाला मिळतील असे सांगितले.प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर संचालन सतीश इंगोले व विजया व्यवहारे यांनी केले तर आभार वैशाली अवथळे यांनी मानले.

वर्धा भारत स्काऊट गाईडच्यावतीने बाल महोत्सवात शहरातील १५ शाळेतील ३५० मुले मुली सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६ नोव्हेंबरच्या शहीदांना देवळीच्या एस.एस. एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र सैनिकांनी सलामी दिली. यावेळी प्रमुख अतिथींनी शहीद स्मृतिंवर पुष्पचक्र अर्पण केले. स्काऊटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल व प्रहारचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण घेत असणाऱ्या तरुणांनी २१ प्रकारच्या अडथळा पार साहसी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक अतिथींसमोर सादर केले.

Web Title: Courage training is essential for every young person and young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.