रानडुकराच्या हल्ल्यात गुराखी ठार
By Admin | Published: June 4, 2017 01:02 AM2017-06-04T01:02:26+5:302017-06-04T01:02:26+5:30
तावी गावालगत जंगलाच्या शेजारी शेळ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर रानडुकराने हल्ला केला. यात तो जागीच ठार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : तावी गावालगत जंगलाच्या शेजारी शेळ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर रानडुकराने हल्ला केला. यात तो जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भाऊराव मडावी (३२) रा. तावी, असे मृत गुराख्यो नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार नाना मडावी गुराखी असून शेळ्या आणि गुरे दररोज जंगलाशेजारच्या झुडपी परिसरात चारायला नेत होता. नित्यक्रमानुसार शनिवारी सकाळी ९ वाजता शेळ्या व जनावर चारायला घेऊन गेले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास झुडपातून रानडुकराने गुराख्यावर हल्ला चढविला. यात गुराखी नाना मडावी गंभीर जखमी झाला. दरम्यान, रानडुकराने पुल्हा हल्ला चढविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वन विभागाच्या गिरड कार्यालयात कळविण्यात आली. तावीचे बिटरक्षक उरकुडे, पोलीस कर्मचारी गजानन राऊत, शेख रहीम, पंकज टाकोणे, रवी घाटूर्ले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर कुटुंबाला वनविभागाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मडावी परिवाराने केली आहे.