व्यसनमुक्त समाज घडविणे काळाची गरज

By Admin | Published: March 2, 2017 12:39 AM2017-03-02T00:39:04+5:302017-03-02T00:39:04+5:30

व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा होते.

Creating an addictive society requires time | व्यसनमुक्त समाज घडविणे काळाची गरज

व्यसनमुक्त समाज घडविणे काळाची गरज

googlenewsNext

तुकाराम घोडे : व्यसनमुक्त समाज जागृती अभियान
वर्धा : व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा होते. आर्थिक व सामाजिक ऱ्हास होतो. वर्धा जिल्हा दारूबंदी घोषित झाला असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली दारू हा चिंतेचा विषय ठरू शकतो. यासाठी प्रबोधन करणे व सामाजिक चळवळ उभी करणे अत्यंत गरजेचे बाब झाले आहे, असे मत कीर्तनकार तुकाराम घोडे महाराज यांनी व्यक्त केले.
सेक्युलर फ्रंट, तथागत बुद्ध विहार मांडवा, आर्या मार्शल आर्ट असोसिएशन, लॉयन्स क्लब गांधी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने झेंडा चौक, मांडवा येथे व्यसनमुक्त समाज जागृती अभियानानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल होते. उद्घाटक पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, मांडव्याचे सरपंच आरती देशमुख, ठाणेदार संतोष शेगावकर, प्रा. मोहन गुजरकर, अनिल नरेडी, सुनील बुरांडे, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, रमेश केला, दक्ष फाउंडेशनचे प्रकाश खंडार, व्यंकट बुंदे, जी.जी. प्रधान, संजय धनुषकर, विजयकुमार नाखले, शंकर मोहड, एकनाथ उरकुडे, हरीष तांदळे, रमेश भगत, पवन परियाल, भगवान आहुजा, दिलीप ढोमणे, सेक्युलर फ्रंटचे इमरान राही मंचावर उपस्थित होते.
देशातील युवा पिढीचा पश्चिमी संस्कृतीकडे ओढा वाढत आहे. आधुनिकतेची भुरळ पडली आहे. फॅशनच्या नादात स्वैराचाराच्या विळख्यात सापडून ही पिढी व्यसनाधीन बनत आहे. देशाचे आधारस्तंभ व्यसनाच्या गर्तेत अडकले आहे. त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे, असे मत इमरान राही यांनी व्यक्त केले. यावेळी दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष अंजना वाडेकर, तंटामुक्ती समितीच्या संगीता मसराम यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन विशाखा ससे, मनीषा खैरकार, भारती वाडेकर यांनी तर आभार हरीष तांदळे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Creating an addictive society requires time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.