गौरक्षण वॉर्डात निघाल्या चाकू-तलवारी; गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 02:39 PM2023-01-09T14:39:47+5:302023-01-09T14:41:19+5:30

युवकास मारण्याची धमकी : सहा आरोपींना बेड्या

Criminal gang hustle in Wardha; Threat to kill youth: Six accused in shackle | गौरक्षण वॉर्डात निघाल्या चाकू-तलवारी; गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ

गौरक्षण वॉर्डात निघाल्या चाकू-तलवारी; गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ

Next

वर्धा : जुन्या वादाच्या कारणातून युवकाच्या घरासमोर दुचाकींवर जात चाकू अन् तलवारी भिरकवून जिवे मारण्याची धमकी देत खिशातून रोख रक्कम हिसकावत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गौरक्षण वॉर्ड परिसरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी ७ रोजी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. तर उर्वरित आरोपी फरार असून, त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

संदेश उर्फ बादल महेंद्र शेंडे (रा. गौरक्षण वॉर्ड) याचा इतवारा परिसरातील गुन्हेगारी टोळीतील सदस्यांसोबत जुना वाद होता. यापूर्वी देखील टोळीतील सदस्यांनी संदेश शेंडे याच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शिवीगाळ केली होती. याच वादातून आरोपी दिनेश पांडे, सोहेल उर्फ आफताब मोंडा, रुतीक तोडसाम, दादू भगत, आदित्य उर्फ टकी खत्री, साहील गौतम राऊत, समीर पठाण, प्रलय कदम, आशिक शेख, योगेश उर्फ भाऊ सूर्यवंशी, रेहांश शेख यांच्यासह चार ते पाच असे एकूण १५ ते १६ गुन्हेगारांची सशस्त्र टोळी पाच ते सहा दुचाकींने संदेश शेंडे याच्या घरासमोर आले. त्यांनी हवेत तलवारी, चाकू तसेच फरशा भिरकावून शिवीगाळ केली. गुन्हेगारांना पाहून संदेशने पळ काढला. दरम्यान, सर्व गुन्हेगारांनी त्याच्या मागे धावत त्यास पकडून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिनेश पांडे याने त्याच्या खिशातील पाचशे रुपये काढले. घाबरलेला संदेश अखेर अंधारात लपून बसला. याप्रकरणी संदेशने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात दिनेश पांडे, सोहेल मोंडा, रुतीक तोडसाम, दादू भगत, आदित्य खत्री आणि साहिल गौतम यांना अटक केल्याची माहिती दिली. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.

Web Title: Criminal gang hustle in Wardha; Threat to kill youth: Six accused in shackle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.