परप्रांतीय मजुरांअभावी कापूस उद्योगांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:05+5:30

राज्यभरात जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस उतरविणे, गंजी लावणे यासह इतरही कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. याकरिता परप्रांतीय मजूर दरवर्षी हंगामात येतात. हंगाम संपल्यानंतर आपापल्या प्रांतात परत जातात. यावर्षीही जिनिंग फॅक्टरीमध्ये परप्रांतीय मजूर आले होते. त्यांच्या माध्यमातून सुरळीत कापसाची खरेदी सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अर्धेअधिक मजूर आपापल्या प्रांतात निघून गेले.

Crisis on cotton industry due to other state labor | परप्रांतीय मजुरांअभावी कापूस उद्योगांवर संकट

परप्रांतीय मजुरांअभावी कापूस उद्योगांवर संकट

Next
ठळक मुद्देखरेदीला ब्रेक : शासनाच्या अस्पष्ट निर्देशामुळे जिनिंग-प्रेसिंग ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना खरिपाची चाहूल लागली असतानाही लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे तत्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे पण; जिनिंग-प्रेसिंगकडे सध्या मजुरांचा अभाव असल्याने आणि खरेदीबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सद्यस्थितीत कापूस खरेदी सुरू करणे सहज सोपे नसल्याचे जिनिंग-प्रेसिंग संचालकांकडून बोलले जात आहे.
राज्यभरात जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस उतरविणे, गंजी लावणे यासह इतरही कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. याकरिता परप्रांतीय मजूर दरवर्षी हंगामात येतात. हंगाम संपल्यानंतर आपापल्या प्रांतात परत जातात. यावर्षीही जिनिंग फॅक्टरीमध्ये परप्रांतीय मजूर आले होते. त्यांच्या माध्यमातून सुरळीत कापसाची खरेदी सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अर्धेअधिक मजूर आपापल्या प्रांतात निघून गेले. आता लॉकडाऊनमुळे जिनिंग- प्रेसिंग बंद असल्याने जे मजूर राहिले आहे, ते येथेच अडकून पडले आहेत. त्यांना आता गावाला जाण्याचे वेध लागले असून ते कोणतेही काम करण्याच्या मानसिकतेत नाही. अशा परिस्थितीत जिनिंग फॅक्टरी सुरू केली तरी सूतगिरणी व कापड उद्योगाला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जिनिंगमालकांनी कापूस खरेदी करून त्याची रुई व गाठी कोणाला विकायच्या, हा मोठा प्रश्न आहे. आर्थिक मंदीमुळे कापसाच्या गाठींनाही भाव नाही. या हंगामात ३४ रुपये खंडीपर्यंत भाव खाली आले आहेत. म्हणजेच व्यापारीही शेतकऱ्यांकडून कमी भावात कापसाची खरेदी करणार. त्यानंतर व्यापाºयांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व धोका लक्षात घेता जिनिंगमालक कापूस खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेऊन शेतकरी आणि जिनिंगमालकांचे हित जोपासण्याची गरज आहे.

जिनिंग संचालकांपुढे याही अडचणी कायम
संचारबंदीच्या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी गोळा होता येत नाही. असे असतानाही कापूस खरेदी सुरू केल्यास शेतकºयांची गर्दी वाढणार आहे. यासोबतच मजुरांचीही मोठे बळ लागणार आहे. त्यामुळे एका जिनिंग फॅक्टरीमध्ये दररोज केवळ २० ते २५ गाड्या घेता येईल. त्याची नोंदणी, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरची व्यवस्था, हात धुण्याची सोय, गाड्या खाली करताना घ्यावयाची काळजी, गाड्या खाली करणे, गंजी लावणे व कारखान्याच्या आत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांची व्यवस्था यासह संख्या याबाबत स्पष्टता असावी.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापूर्वीच सर्व जिनिंग फॅक्टरीमध्ये आधीच कापूस, रूई, गाठी, सरकी यांचा प्रचंड साठा होता. लॉकडाऊनमध्ये ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस, लोडिंग-अनलोडिंग करणारे हमाल यांचेही काम ठप्प झाल्याने हा साठा गोदामात पाठविता आला नाही. परिणामी, जिनिंगमध्ये साठा कायम असल्याने नवीन साठ्याकरिता जागा नाही. येणारा कापूस ठेवायचा कुठे व प्रोसेसिंग झाल्यावर रुई व सरकीकरिताही जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जुन्या साठ्याची उचल झाल्याशिवाय जिनिंगमालक खरेदी सुरू करू शकणार नाहीत.

Web Title: Crisis on cotton industry due to other state labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस