धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:46 PM2017-10-23T23:46:33+5:302017-10-23T23:46:55+5:30

निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले.

Crop damage due to dam's backwater | धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान

धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान

Next
ठळक मुद्देत्रासदायक निम्न वर्धा प्रकल्प : न्यायाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले. वाठोडा येथील शेतकरी अतुल रामदास ठाकरे यांच्या एक हेक्टर शेतात धरणाचे बॅकवॉटर शिरल्याने कपाशी पीक गमावण्याची वेळ या शेतकºयावर आली आहे. याबाबत पीडित शेतकºयाने संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे.
बॅक वॉटरमुळे सदर शेतकºयाचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले असून सदर नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. अतुल ठाकरे यांचे मौजा वाठोडा शिवारात शेत आहे. या हंगामात शेतकºयाने कपाशीची लागवड केली. तर दिवाळी दरम्यान शेतात कपाशीची वेचणी करण्यात येणार होती. यातच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने निम्न वर्धा धरणाच्या बॅकवॉटरची पातळी वाढली. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. हे पाणी नाल्यामार्गे थेट ठाकरे यांच्या कपाशीच्या शेतात शिरले. त्यामुळे त्यांच्या शेताला सद्यस्थितीत तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतातील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडत आहे. संबंधित विभागाकडून सदर शेतकºयाला पाण्याची पातळी वाढणार असल्याची कुठलीही पुर्वसूचना देण्यात आली नाही. हा प्रकार नित्याचाच असल्याचे सांगण्यात येते. बॅकवॉटर व ओलाव्यामुळे सदर शेतकºयावर हाती आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे. शिवाय धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास उर्वरीत शेतातही पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शासनाने माझे शेत अधिग्रहीत करून या समस्येतून सुटका करावी अशी विनंती निवेदनातून संबंधित शेतकºयाने केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांना दिले असून प्रतिलिपी आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, मुख्य कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांना दिली आहे.
शासनाने जमीन अधिग्रहित करण्याची मागणी
शासनाने जमीन अधिग्रहीत केली नसताना शेतात पाणी साचल्याने कपाशी पिकाचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार नेहमीचाच असल्याने नुकसान सोसावे लागते. त्यापेक्षा शासनाने जमीन अधिग्रहीत करुन घ्यावी अशी मागणी निवेदनातून शेतकºयाने केली आहे. संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकºयांना बसला. नुकसानीची पाहणी करणे गरजेचे आहे.

Web Title: Crop damage due to dam's backwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.