जलपातळी खालावल्याने शेतातील पीक वाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:27 PM2019-06-05T22:27:49+5:302019-06-05T22:28:14+5:30
यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असून तशी मागणी आहे.
नजीकच्या चोरआंबा येथील राजेंद्र भालचंद्र माळोदे यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांनी शेतात विहीरही खोदली. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत मुबलक पाणी राहत नसल्याने पाच वर्षांपूर्वी शेतातच बोअरवेल करण्यात आली. याच बोअरवेलचा आधार सदर शेतकºयाला उन्हाळी पीक घेण्यासाठी रहायला. परंतु, यंदा तीही जानेवारीतच कोरडी झाल्याने शेतातील उभे मिरची, केळी व टमाटरचे पीक करपले.
यात त्यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर बोअरवेल कोरडी झाल्याने या शेतकºयाने शेतातच तीन ठिकाणी नव्याने ५०० फुटांपर्यंत बोअरवेल केली; पण तीनही बोअरवेलला पाणीच लागले नसल्याने शेतकरी माळोदे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणी टंचाईच्या झळा सोसणाºया हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शासकीय मदत जाहीर करण्याची गरज आहे.
माळोदे हे प्रयोगशील अन् प्रगतीशील शेतकरी
शेतकरी माळोदे यांनी मूलांच्या मदतीने परंपरागत शेतीला फाटा देत केळी, मिरची, हळद, टमाटर उत्पादनावर भर दिली. त्यांच्या या प्रयोगामुळे यांना परिसरात प्रगतीशिल शेतकरी म्हणूनच नवी ओळख मिळाली; पण पाणीटंचाईमुळे यांना यंदा मोठा फटका बसला आहे.