वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पीक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:56 IST2020-01-09T10:55:58+5:302020-01-09T10:56:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उभे झालेले पीक भुईसपाट झाले आहे. आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पीक भुईसपाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उभे झालेले पीक भुईसपाट झाले आहे. आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेले कापसाचे पीक पावसाच्या एका फटक्यात ओलेचिंब होऊन गेले आहे. तर धान, तूर, सोयाबीनची पिके भुईसपाट झाली आहेत. यावर हरभरा व गव्हावर गेरवा आणि मर रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पिकाची प्रतवारीही घटणार आहे. त्याचा परिणाम शेतकºयाच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. पावसामुळे धानासोबत आता कपासाच्या सरकीलाही अंकुर फुटू लागले आहेत.
ही परिस्थिती पाहता, हेक्टरी २० हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.