लसीकरणासाठी गर्दी चार तास वयोवृद्ध तिष्ठत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 05:00 AM2021-07-10T05:00:00+5:302021-07-10T05:00:10+5:30

अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. मात्र १८ ते ४४ वयोगटातील व त्यावरील वयोगटासाठी वेगळे भाग न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्त्रिया, वृद्ध नागरिक यांना त्रास सहन करावा लागला. ज्यांनी नोंदणी केली आहे ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांच्यासाठी वेगळी लाईन तयार करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुधीर वाकोडकर यांनी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय यांच्याकडे केली.

The crowd for the vaccination aged four hours | लसीकरणासाठी गर्दी चार तास वयोवृद्ध तिष्ठत

लसीकरणासाठी गर्दी चार तास वयोवृद्ध तिष्ठत

Next
ठळक मुद्देटाईम स्लॉटनुसार टोकन देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देउरवाडा/आर्वी : येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र कोणतीही बसण्याची सेवा सुविधा नसल्याने अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना चार तास तिष्ठत उभे राहावे लागल्याने गुरुवारी रोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे. मात्र १८ ते ४४ वयोगटातील व त्यावरील वयोगटासाठी वेगळे भाग न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्त्रिया, वृद्ध नागरिक यांना त्रास सहन करावा लागला. ज्यांनी नोंदणी केली आहे ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांच्यासाठी वेगळी लाईन तयार करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुधीर वाकोडकर यांनी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय यांच्याकडे केली. तर याबाबत मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गर्दी पाहता दोन दिवस लसीकरणाचे वेग‌ळे शिबिर घ्यावे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांना भाजपचे आर्वी विधानसभा क्षेत्राध्यक्ष विजय बाजपेयी यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसरी लाट ओसरली परंतु नागरिकांमध्ये पूर्व अनुभव पाहता तिसरी लाट येण्यापूर्वी आपले लसीकरण व्हावे यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत असल्याने लसीकरण केंद्रावर पहाटेपासून लांबच लांब रांग राज्यभर दिसत आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सुध्दा लसीकरणासाठी रांगा लागल्या आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत लसीकरणाची वेळ आहे. आर्वीत सकाळी ७ वाजल्यापासून लसीकरणासाठी नागरिक रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. टोकन पध्दतीने लसीकरण सुरु असले तरी एका लसीसाठी तब्बल चार पाच तास रांगेत उभे राहण्याची वेळ आर्वीकरांवर आली आहे.
गुरूवारी नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून टोकन पध्दतीने अर्धा किंवा एक तासाचे टाईम स्लॉट पाडून ३० किंवा ६० नागरिकांना येण्याची वेळ सांगून टोकन वितरित करावे अशी सूचना केली. यासाठी आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मोहन सुटे यांच्याशी चर्चा केली. टाईम स्लॉट नुसार टोकन वितरित केल्यास नागरिकांना जास्तीत जास्त ३० ते ६० मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल. 
त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला, अपंग आदींची गैरसोय होणार नाही. यावेळी सागर निर्मळ, सुनील बाजपाई, संजय थोरात आदी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: The crowd for the vaccination aged four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.