‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’चा आवाज केला बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:35 PM2019-08-20T23:35:40+5:302019-08-20T23:36:34+5:30
ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. आंदोलनात काँग्रेससह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सध्या देशात ईव्हीएम संदर्भात राजकीय वातावरण तापत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाला आम्ही जाब विचाराव तर ते या विषयी कुठल्याही प्रकारची चर्चा करायला असमर्थ ठरत आहे. आपले मत ज्याला दिले त्याला मिळत नाही याचाच अर्थ आपल्याला मिळालेला लोकशाही हक्काची पायमल्ली होत आहे. आताच सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. ईव्हीएममुळे लोकशाहीला धोका आहे. शिवाय संविधान पूर्णपणे धोक्यात आहे, असे मत यावेळी अतुल वांदिले यांनी मांडले.
आंदोलनात काँग्रेसचे नेते शालीक डेहणे पाटील, रफिकभाई, विदर्भ आघाडीचे अध्यक्ष अनिल जवादे, प्रहारचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे, अशोक रामटेके, राकाँचे आफताब खान, आम आदमी पार्टीचे भाऊराव कोटकर, प्रमोद जुमडे, प्रफुल क्षीरसागर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजू धोटे, ज्वलंत मून, अनिल हिवंज, सौरभ तिमांडे, सतीश सावंत, सतीश घाडघाटे, अमोल बोरकर, जितेंद्र शेजावल, दिनेश वाघ, महेश माकडे, सुनील कांनकते, राजू धोटे, प्रवीण श्रीवास्तव, राजू सिन्हा, गजू कलोडे, गोमाजी मोरे, किशोर चांभारे, रमेश घंगारे, पंकज साबळे, निखिल कांबळे, प्रेमदास सोरदे, मंगला ठक यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.