धानोली गावात समस्यांचा कळस

By Admin | Published: June 12, 2017 01:46 AM2017-06-12T01:46:31+5:302017-06-12T01:46:31+5:30

तालुक्यातील धानोली (मेघे) येथे विविध समस्यांनी कळस गाठला असताना ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

The culmination of problems in the village of Dhanoli | धानोली गावात समस्यांचा कळस

धानोली गावात समस्यांचा कळस

googlenewsNext

गावात कृत्रिम पाणीटंचाई : घाणीचे साम्राज्य तरीही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील धानोली (मेघे) येथे विविध समस्यांनी कळस गाठला असताना ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वॉर्ड क्र. २ व ३ मधील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नाईलाजास्तव नागरिकांना लिकेज व्हॉल्व्हमधून पाणी भरावे लागत आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांना जलजन्य आजार होण्याची भीती आहे.
नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने येथील रहिवाशी लिकेज व्हॉल्व्हमधून पाणी भरतात. पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. यावर कोणतीच उपाययोजना केली नाही. काही भागात सांडपाण्याचे डबके साचून दुर्गंधी सुटली आहे. पाईपलाइनच्या लिकेज व्हॉल्व्हमध्ये अनेकदा सांडपाणी जमा होते. त्यामुळे साथीचे ताजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या व्हॉल्व्हवर पाणी भरण्याकरिता नागरिकांची झुंबड उडते. गावात काही भागात तीन लाख रुपये खर्चून नळावर मीटर लावण्यात आले. मीटर सदोष असल्याने याचाही उपयोग होत नाही. गावात एकीकडे नळावर मीटर लावले तर सार्वजनिक नळांवर तोट्याच लावण्यात आल्या नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून अनेकदा रस्त्यावरून पाणी वाहते. यामुळे रस्त्यावर चिखल तयार झाला असून वाहन चालकांची कसरत होत आहे. कुठे पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर कुठे रस्त्यावरुन पाणी वाहत, अशी स्थिती आहे. सरपंच व सचिव यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.स्

नळावर मीटर बसविण्यातही गैरप्रकार
नळावर मीटर लावण्याच्या कामात गैरप्रकार करण्यात आला. याची चौकशी झाली पाहिजे. नालीसफाईचे बोगस देयके देण्यात आली. पथदिवे खरेदीत प्रचंड गौडबंगाल आहे. याला सरपंच जबाबदार असून याविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
डांबरी रस्त्याच्या बाजूने पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे. यातील व्हाल्व्ह लिकेज असल्याने नागरिक येथून पाणी भरतात. यात दुषित पाणी जात असल्याने हा प्रकार आरोग्याशी खेळखंडोबा करण्यासारखा असल्याचे बोलले जाते.

Web Title: The culmination of problems in the village of Dhanoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.