खरिपात ४.२८ हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:13+5:30

शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी कृषीला बळकट करण्याचे नियोजन शासन व प्रशासन स्तरावर केले जात आहे. तसे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहे.

Cultivates to be sown on 4.28 hectares | खरिपात ४.२८ हेक्टरवर होणार लागवड

खरिपात ४.२८ हेक्टरवर होणार लागवड

Next
ठळक मुद्देकृषी विभागाचा अंदाज : कोरोनाच्या सावटात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या लॉकडाऊनमधून शेतीशेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. संपूर्ण भारत देत कोरोनामुक्त होण्यासाठी आणखी काही महिने लागतील असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या याच सावटात यंदा खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची तसेच कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी कृषीला बळकट करण्याचे नियोजन शासन व प्रशासन स्तरावर केले जात आहे. तसे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीपात वर्धा जिल्ह्यात एकूण ४ लाख २८ हजार ५२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार २०० हेक्टरवर भूईमुंग, ६५ हजार हेक्टरवर तूर, ८०० हेक्टरवर उडीद, १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. तसे प्राथमिक नियोजनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

बोगस बियाण्यांवर राहणार करडी नजर
कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात बिगस बियाण्यांचा शिरकाव होऊ नये म्हणून कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय प्रभावी अंमलबजावणीही केली जाणार आहे.

१.२३ लाख खतांच्या आवंटनाला मंजूरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध खतांची कमतरता भासू नये म्हणून नियोजन करून ७९ हजार मेट्रीक टन खताची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर १ लाख २३ हजार मेट्रीक टन खत वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याच्या आवंटनाला शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. मंजूर झालेले खत टप्प्या टप्प्याने वर्धा जिल्ह्याला मिळणार आहे.

चार हजार क्विंटल तुरीचे बियाणे मिळणार
वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात. तुरीचे क्षेत्र घटू नये शिवाय शेतकºयांनाही वेळीच तुरीचे बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार केला आहे. शिवाय तो शासनाला सादर केला आहे. त्यानुसार ४ हजार क्विंटल तुरीचे बियाणे वर्धा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.

सोयाबीनचेही बियाणे वेळीच मिळणार
सध्या उन्हाळवाहीच्या कामांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. उन्हाळवाहीची कामे पूर्ण होत पावसाला सुरूवात होताच शेतकरी बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी धाव घेणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून यंदा वर्धा जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणार आहे.

११ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची केली मागणी
वर्धा जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी शासनाकडे नोदविली होती. त्यानंतर शासनाच्या मध्यस्तीअंती १९ लाख कापूस बियाण्यांचे पाकिट वर्धा जिल्ह्याला देण्याचा होकार सिडस् कंपन्यांनी दर्शविला आहे.
 

Web Title: Cultivates to be sown on 4.28 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.