आॅनलाईन फसवणुकीच्या तक्रारीकडे ग्राहकांची पाठ
By admin | Published: March 15, 2016 03:59 AM2016-03-15T03:59:18+5:302016-03-15T03:59:18+5:30
आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेकवेळा समोर आले
श्रेया केने ल्ल वर्धा
आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. असे तरी या खरेदी दरम्यान झालेल्या फसवणुकीची तक्रार मात्र एकाही ग्राहकाकडून नोंदविण्यात आलेली नाही. यातून ग्राहकांमध्ये याविषयी असलेल्या जागृतीचा अभाव दिसून येतो. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना न्याय देणे व ग्राहकांना त्यांच्या हक्काविषयी जागरुक करणे हे ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रमुख उद्दीष्ट असते. याविषयी जागृती करण्यात येत असली तरी ती तितकीशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसनू येते.
वर्धा येथील ग्राहक तक्रार निवारण मंचकडे यासंदर्भात अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. सध्या आॅनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा ‘ट्रेण्ड’ वाढतीवर आहे. हे लोन निमशहरी भागापर्यंत पोहचले आहे. विशेषकरुन मोबाईल खरेदी ही आॅनलाईन केली जाते. शिवाय आॅनलाईन शॉपिंग साईटसकडून ग्राहकांवर विविध आॅफर्स मधून खरेदी करीता प्रलोभने दिली जातात. यात अनेकदा ग्राहकांच्या माथी बनावट वस्तू अथवा तकलादू वस्तू दिल्या जातात. याची तक्रार कुणाकडे करावी हाच प्रश्न ग्राहकांना पडतो. आॅनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी वारंवार माहिती दिली जात असली तरी यामुळे झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीविषयी जागृती करणे गरजेचे झाले आहे.
३ हजार ५३८ तक्रारींचा निपटारा
४मंच स्थापनेपासून जिल्ह्यात आजवर ३,७०३ तक्रारी नोंदविण्यात आल्या. यापैकी ३,५३८ तक्रारींचा आजवर निपटारा झाला. यात १६५ तक्रारी निकालाच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी काही तक्रारी विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. तीन सदस्यीय मंचाकडून यातक्रारींचा निपटारा करण्यात येतो. जिल्ह्यातील या समितीचे अध्यक्ष पी.एस. जाधव हे आहेत. तर सदस्यपदी मिलिंद केदार व स्मिता चांदेकर आहेत.
ई-फोरम पोर्टल प्रस्तावित
४शासन स्तरावर ई- फोरम असे पोर्टल तयार करण्यात येणार असून या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी आॅनलाईन पद्धतीने नोंदविणे तसेच तक्रारीच निपटरा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रियेची नोंद केली जाणार आहे. एका क्लिकवर तक्रारकर्त्यास संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडें असून काही महिन्यात हे पोर्टल सुरू होईल. यानंतर तक्रारकर्त्यास प्रत्यक्ष येवून तक्रार नोंदविण्याची गरज भासणार नाही. यातून तक्रारकर्त्यांना मंचकडे तक्रार नोंदविणे अधिक सहज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी हे पोर्टल सुरु करणार असल्याची माहिती वर्धा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सहायक अधीक्षक राजेश मुक्तेश्वर यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्यक्रम
४ज्येष्ठ नागरिक व विधवा महिला यांच्याकरिता ग्राहक तक्रार निवारण मंचने विशेष तरतूद केली असून या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातात. मंचकडे दाखल तक्रारींचा निपटारा करण्याची १० दिवसांची कालावधी असतो. या कालावधीत तक्रारी निकाली काढणे अगत्याचे असते. असे निर्देश आहे. यातही विधवा महिलेने अथवा ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारीकरिता अर्ज केल्यास या तक्रारींना प्राधान्यक्रम देत सोडविण्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यात या अंतर्गत १७० तक्रारी दाखल असून १३८ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. ५२ तक्रारी प्रक्रियेत आहेत.