वर्धमनेरी येथे सिलेंडरनं घेतला पेट; आग लागून दोन मुली भाजल्या
By अभिनय खोपडे | Updated: April 16, 2023 22:37 IST2023-04-16T22:37:43+5:302023-04-16T22:37:50+5:30
आमदार दादाराव केचे यांनी आर्वी नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड पाठवून गावकऱ्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

वर्धमनेरी येथे सिलेंडरनं घेतला पेट; आग लागून दोन मुली भाजल्या
आर्वी : वर्धमनेरी येथील आशिष बडगे यांच्या घरी रात्री ८ वाजता स्वयंपाक घरात सिलेंडरने पेट घेतल्याने आग लागली.
घरातील सर्व सामान जळाले त्यामुळे मोठे नुकसान झालं आहे.
आमदार दादाराव केचे यांनी आर्वी नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड पाठवून गावकऱ्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर अंजली (८) तनु (४) या मुलींना उप जिल्हा रुग्णालय आर्वी येथे दाखल करण्यात आले. आज विझविण्याकरिता गावकरी अनिल मोरे धीरज मनोहर विकिम आश्रम मनोज मुदगल अनिल कोकाटे रवी शिंपीकर पंजाबराव वरठी यांनी सहकार्य केले.