दाभा रस्त्यावर थांबणाºया वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:05 AM2017-10-25T01:05:28+5:302017-10-25T01:05:38+5:30
येथून दाभाकडे जाणाºया रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी ठेवली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पायी चालणेही अवघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : येथून दाभाकडे जाणाºया रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी ठेवली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पायी चालणेही अवघड झाले आहे. यात अनेकदा अपघात झाले असून वाहतुकीची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.
महामार्ग क्र. ६ वरून दाभा गावाकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे. या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, वीज मंडळ, वनविभाग, सामाजिक वनीकरण ही महत्त्वाची कार्यालये आहे. दाभा, उमरी, धावसा, सावल, गवडी, येनगाव, पिपरी, लिंगामांडवी या गावांना ये-जा करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. दररोज शेकडो शेतकरी विद्यार्थी ये-जा करतात. बसेस, आॅटो रिक्क्षा आणि जीप या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या रस्त्यांच्या सुरूवातीला अनेक दुकाने आहेत. काही महिन्यांपूर्वी कारंजा नगर पंचायतने पुढाकार घेत अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीला मोकळा केला होता; पण आता पुन्हा अतिक्रमणाला सुरूवात झाली आहे.
दुकानांमध्ये येणारे वा चहा कॅन्टीनवर येणारे ग्राहक आपली वाहने सर्रास रस्त्यावर उभी करतात. कार व जीपही रस्त्यावर उभी केली जाते. यामुळे वाहतूक खोळंबत आहे. वाहने तर सोडा पायी चालनेही कठीण होते. या रस्त्याला अनेकदा वाहनतळाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यावरील ही बेशीस्तपणे उभी ठेवलेली वाहने हटवून वाहतूक सुरक्षित करणे गरजेचे झाले आहे.