निर्भय मॉर्निंग वॉकद्वारे दाभोळकरांच्या हत्येचा निषेध
By admin | Published: April 23, 2017 02:07 AM2017-04-23T02:07:56+5:302017-04-23T02:07:56+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे व प्रा. एम.एन. कलबूर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे व प्रा. एम.एन. कलबूर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून गुरुवार २० एप्रिलला स्थानिक शिवाजी पुतळ्या मॉर्निग वॉक काढण्यात आला. सदर मॉर्निग वॉकने महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मार्गक्रमण केले. निर्भय मॉर्निंग वॉक काढून हत्येचा निषेध करण्यात आला.
दाभोळकर यांची हत्या होवून ४४ महिने व पानसरे यांची हत्या होवून २७ महिने लोटली. परंतु, अद्याप मारेकरी व त्यामागील सूत्रधाराला अटक झाली नाही. ही खेदाची बाब आहे. तेव्हा दर महिन्याच्या २० तारखेला जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे
निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, बाबाराव किटे, सुधाकर मिसाळ, सुनील ढाले, विकास दांडगे, दिलीप उटाणे, असलम पठाण, वंदना रामटेके, रोशनी पठाण, भरत कोकावार आदी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)