दगदग संपली, सुविधांचा मात्र अभावच

By admin | Published: August 15, 2016 12:56 AM2016-08-15T00:56:59+5:302016-08-15T00:56:59+5:30

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत नवीन टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना खिडकीसमोर तासनतास रांगेत ....

Dagdag ran, lack of facilities only | दगदग संपली, सुविधांचा मात्र अभावच

दगदग संपली, सुविधांचा मात्र अभावच

Next

टोकण प्रणाली सुरू : रांगा लागत नसल्या तरी जागा अपुरी असल्याने अडचण
कारंजा (घा.) : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत नवीन टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना खिडकीसमोर तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज उरली नाही. मात्र बसण्यासाठीच पुरेशी जागा नसल्याने नागरिकांना अडचण सहन करावी लागते. अनेकांना तर उभे राहूनच टोकन स्क्रिनकडे टक बघत राहावे लागते.
बँकिंग क्षेत्र ग्राहकांसाठी अधिकाधिक कसे सोपे व्हावे, रोखीचे व्यावहार करणे सहज शक्य व्हावे याकरिता दररोज नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात येत आहे. या सुविधा योग्य रितीने ग्राहकांना पुरविताना मात्र बँक प्रशासन कमी पडत असल्याचे कारंजा येथे पाहावयास मिळते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथे सुविधा दिल्या जात असल्या तरी रोखपालांच्या आडमुठेपणाचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. सुरू असलेली मशीन खराब असल्याची बतावणी करून नागरिकांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचा अनुभव ग्राहक नेहमीच घेतात. बँकेत नुकतेच टोकन मशीन लावण्यात आले. याद्वारे स्क्रिनवर टोकन क्रमांक दिसतो. त्यांनतरच ग्राहकाला रोकड जमा अथवा काढण्याकरिता खिडकीवर जावे लागते. परंतु रोखपाल जोपर्यंत या मशीनला नेस्क्ट कमांड देत नाही तोपर्यंत पुढील टोकन नंबर दिसत नाही. त्यामुळे रोखपालाकडुन बोळवण केली जात असल्याचे ग्राहकच सांगत आहेत.
या प्रणालीद्वारे रांग लावावी लागणार नाही हा बकेचा एकमेव उद्देश असला तरी शेवटी मशीन आॅपरेट करण्यासाठी बसविलेले कर्मचारी काम व्यवस्थित करीत नसल्याने रांगच बरी होती आता तर त्याही पेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असल्याचे ग्राहक सांगत आहेत.
टोकन मशीन मध्ये क्रमवारीत सुरू असलेला एक टोकन क्रमांक लिहीलेला कागद प्रिंट होतो व त्यावर एक नंबर असतो. समोरील दिलेल्या स्क्रिनवर तो नंबर सतत झळकत असतो. दोन ते तीन प्रकारच्या सिरीज मध्ये टोकन नंबर मिळतो. ज्या नंबरची ओरड झाली त्याने खिडकीवर जावून व्यवहार करावयाचे असतात.
त्याच प्रकारे रांगेतपासून मुक्तता व्हावी म्हणून बँकेमध्ये ग्रीन चॅनल काऊंटर सुरू करण्यात आले. यात विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएम द्वारेच व्यवहार करण्याची सुविधा आहे. परंतु सदर मशीन महिनाभरापासुन बंद असल्याचे सांगण्यात येते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतच आहे.
कारंजा शहरात दोन एटीएम मशीन आहेत. याम्ध्ये एक मशीन बँक आॅफ इंडियाचे तर दुसरे स्टेट बँकेचे आहे. परंतु दोन्ही मशिन वारंवार बंद असतात. त्यामुळे पसे कसे काढावे हा प्रश्न ग्राहकांना पडतो. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष घालून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)

ग्रीन चॅनल प्रणालीही कुचकामी
रांगेतपासून मुक्तता व्हावी म्हणून बँकेमध्ये ग्रीन चॅनल काऊंटर सुरू करण्यात आले. यात विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएम द्वारेच व्यवहार करण्याची सुविधा आहे. परंतु सदर मशीन महिनाभरापासुन बंद असल्याचे सांगण्यात येते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतच आहे. तसेच शहरातील दोन्ही एटीएम वारंवार बंद असतात. त्यामुळे व्यवहार कसे करावे असा प्रश्न ग्राहकांना पडतो. त्यामुळे व्यवहार प्रभावित होत आहे.
 

Web Title: Dagdag ran, lack of facilities only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.