धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:05 PM2019-04-24T22:05:15+5:302019-04-24T22:06:08+5:30

जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे.

Daham water run-up? | धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

Next
ठळक मुद्देप्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मिळतोय खरांगणा (मो.) मध्ये थांबा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे. असे असले तरी सध्या धामच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून काही पुढारी बनवा-बनवी धोरण अवलंबत आहेत. याच संधीचे सोनकरून काही जण धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पळवा-पळवी करीत असल्याचे बघावयास मिळते.
प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. वर्धा नगरपालिका प्रशासन प्रत्येक दिवशी धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून सुमारे ३२ एमएलडी पाण्याची उचल करून उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रीया करून ते त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १५ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहराशेजारी असलेल्या सुमारे १३ गावांमधील १६ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने सध्या भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना धाम मधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने न.प. प्रशासनाकडून सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, दुसरी बाजू लक्षात घेतली असता सध्या वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महिन्यातून एकदाच धाम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. अशातच खरांगणा (मोरांगणा) परिसरात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अडविल्या जात असल्याने सध्या वर्धा शहरानजीकच्या पवनार व येळाकेळीपर्यंत कमी पाणी पोहोचत आहे. पूर्वीच धाम प्रकल्पात नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय इतर लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी सुमारे १५ दिवस सुकळी प्रकल्पाने वर्धेकरांची तहाण भागविली. अशातच पाण्याची अडवणूक होत असल्याने संंबंधित प्रशासनाने तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

Web Title: Daham water run-up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी