धरण भरले; अर्धवट पाटचºयांअभावी पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:36 AM2017-10-23T00:36:59+5:302017-10-23T00:37:11+5:30

यंदाच्या पावसाळ्यात तुलनेत पाऊस कमी आला. पण आलेल्या पावसामुळे काही धरणे ओसंडून वाहली. यात मदन उन्नईचा सहभाग आहे.

Dam is full; There is no water due to the absence of half-way | धरण भरले; अर्धवट पाटचºयांअभावी पाणी नाही

धरण भरले; अर्धवट पाटचºयांअभावी पाणी नाही

Next
ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता : अर्धवट असलेले काम पूर्ण करण्याची मागणी

अरविंद काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : यंदाच्या पावसाळ्यात तुलनेत पाऊस कमी आला. पण आलेल्या पावसामुळे काही धरणे ओसंडून वाहली. यात मदन उन्नईचा सहभाग आहे. हे धरण १०० टक्के भरल्याने रबी हंगामात शेत पिकांना पाणी देता येईल, अशी आशा या भागातील शेतकºयांमध्ये पल्लवीत झाली आहे. परंतु शेतकºयांच्या शेतापर्यंत असलेल्या पाटचºया दुरवस्थेत असल्याने धरणातील पाण्याचा उपयोग कमी आणि अपव्यय अधिक अशी अवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी या भागातील शेतकºयांची आहे.
रबी पिकाला सिंचनासाठी पाणी मिळेल व शेती हिरवीगार होईल असे हिरवे स्वप्न शेतकरी रंगवत असले तरी या भागातील एक कंपनी पाण्याचा अमर्याद वापर करीत असल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळेल की नाही अशी सध्या परिसरात ठिकठिकाणी चर्चा होताना दिसते. सेलू तालुक्यातील मदन उन्नई धरणाचे सिंचनाचे कार्यक्षेत्र १५०० हेक्टर आहे; पण प्रत्यक्षात ५०० हेक्टर शेतीलाच सिंचनासाठी पाणी मिळते. उरलेली शेती अजुनही सिंचनाखाली आलेली नाही. १३ कि़मी. लांबीच्या उजव्या व डाव्या कालव्याला जागो जागी भगदाड पडले आहेत. त्यामुळे पाणी रस्त्याने पळते.
धरण निर्मितीपासून कालव्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम झालेले नाही. त्यामुळे डावा व उजवा हे दोन्ही कालवे शेवटपर्यंत पाणी पोहोचविण्यात असमर्थ ठरत आहे. कालवा समतल नाही. चढ उतार असल्याने पाणी पुढे सरकत नाही. त्यातच मोठा प्रमाणावर लिकेज असल्याने साधे सुरगावपर्यंत पाणी पोहचत नाही. शेतकºयांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
धरणाच्या पाटचºयांची स्वच्छता करण्यात आली नसल्याने ठिकठिकाणी पाणी अडून त्याचा अपव्यय होत आहे. यामुळे असलेल्या पाण्याचा लाभ या शेतकºयांना मिळेल अथवा नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पाणी सोडण्यापूर्वी पाटचºयांची स्वच्छता करून पाण्याचा लाभ शेतकºयांना होईल याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाटचºयांची दुरूस्ती गरजेची
मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा १३ कि़ मी. लांबीचा आहे. १५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे हे क्रमप्राप्त असताना सध्या ५०० हेक्टरलाच पाणी मिळत आहे.
सदर धरणाच्या निर्मितीपासून दोन्ही कालव्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे जागो जागी लिकेज आहेत. परिणामी, सोडण्यात आलेले पाणी इतर ठिकाणी वाहून जाते. याचा कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकºयांना ऐन हंगामात फटका सहन करावा लागतो.
कालवे समतल असायला हवे; पण कुठे चढ तर कुठे उतार असल्याने पाणी नियोजित वेळेत नियोजित ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे सिंचनाासाठी धरणाचे पाणी मिळेल अशी आशा असणाºया शेतकºयांची आशा केवळ आशाच राहते. वेळीच शेतपिकांना पाणी देणे येत नाही. नादुरूस्त पाटचºया दुरूस्तीची मागणी आहे.

या भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच परिसरातील पाणी समस्या निकाली निधावी या हेतूने मदन उन्नई धरणाची निर्मिती करण्यात आली. परंतु, या धरणाच्या अर्धवट असलेल्या पाटचºया नेहमीच या भागातील शेतकºयांच्या अडचणी वाढवतात. बहुता शेतात पाणी घुसत असल्याने उभ्या पिकांची नासडी होते. शेतकºयांची समस्या लक्षात घेता नादुरूस्त आणि अर्धवट पाटचºयाची कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.
 

Web Title: Dam is full; There is no water due to the absence of half-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.