धरणग्रस्तांचे जिल्हाकचेरीपुढे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:32 PM2018-02-25T22:32:31+5:302018-02-25T22:32:31+5:30

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या विविध समस्या आहेत. त्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्तांनी जिल्हाकचेरी समोर २३ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Damage to the dams before the District Collector | धरणग्रस्तांचे जिल्हाकचेरीपुढे धरणे

धरणग्रस्तांचे जिल्हाकचेरीपुढे धरणे

Next
ठळक मुद्देसमस्या सोडविण्याची मागणी : अप्पर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समितीचे आंदोलन

ऑनलाईन लोकमत
वर्धा : अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या विविध समस्या आहेत. त्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्तांनी जिल्हाकचेरी समोर २३ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांवर गत दोन दिवसांपासून सकारात्मक विचार न झाल्याने रविवारी तिसºया दिवशीही आंदोलन सुरूच होते. धरणग्रस्तांच्या विविध समस्या त्वरित निकाली काढा अशी त्यांची मागणी आहे.
जिल्ह्यात एकूण ३ हजार ४६६ प्रकल्पग्रस्त असून केवळ ११३ प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देण्यात आली आहे. ३ हजार ४२३ प्रकल्पग्रस्त अनुनही सरकारनी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. १८ एप्रिल २०१७ ला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मुंबई येथे चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी मोबदला देण्याचे कबुल केले. तसेच २१ डिसेंबर २०१७ ला मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी आंदोनकर्त्यांची मागणी रास्त असून तो तुमचा हक्क असल्याचे कबुल करीत तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे असा उद्देश ठेवून २१ जानेवारी २०१८ ला आयुक्त नागपुर, आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अमरावतीसह वर्धा आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले; पण अद्यापही यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. ६ जानेवारी २०१८ ला ना. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवित या प्रकरणी तात्काळ बैठक लावून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा असे सांगितले. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या निकाली काढण्यात आल्या नाही. उपेक्षित प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचे त्वरित वाटप करण्यात यावे. १८ एप्रिल २०१७ ला मुंबईच्या मंत्रालयात ना. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली असून त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटपाकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. न्यायालयाने वाढीव मोबदला दिलेला असून त्याप्रमाणे सरसकट प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी अप्पर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मागण्या रेटण्यात आल्या. आंदोलनात वर्षा मनोहरे, नितेश मनोहरे, मंगेश वानखडे, लवकुश माने, किशोर उंदरे, सुभाष दहिवाडे, श्रीकृष्ण कठाणे, श्रीधर खोपे, राजु दहिवाडे, सुनील माहूरे, भास्कर भुजाडे, राजेंद्र बनकर, नाना भुजाडे, नंदकिशोर खरबडे, दीपक पुंड, गजानन मनोहरे आदी सहभागी झाले होते.
घंटानाद करून नोंदविला शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध
आंदोलनादरम्यान धरणग्रस्तांना वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने देण्यात आली. धरणग्रस्तांच्या समस्या निकाली काढा कशी मागणी करीत सदर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण्यांच्या निषेधार्थ जिल्हाकचेरी समोरील आंदोलनादरम्यान घंटानाद केला.

Web Title: Damage to the dams before the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.