दानपेटी आणि दुचाकी चोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:37 PM2017-10-30T22:37:51+5:302017-10-30T22:38:19+5:30
येथील शिवाजी मार्केट परिसरात दोन युवक चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना त्यांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील शिवाजी मार्केट परिसरात दोन युवक चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना त्यांना अटक केली. त्यांना पोलिसी हिसका दाखवित अधिक विचारणा केली असता त्यांच्या या दोघांनी वर्धेसह नागपुरातही दुचाकी चोरी केल्या. शिवाय मंदिरातील दानपेट्याही लंपास केल्याचे समोर आले. यातील एकाच नाव कृष्णा गजानन बलखंडे(२१) रा. संत कबीर वॉर्ड, हिंगणघाट असे असून दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, सोमवारी शिवाजी मार्केट मार्गावर हिंगणघाट येथील दोन मुले चोरीची दुचाकी घेवून फिरत आहे, अशी माहिती हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता एक विधी संघर्षित बालक व त्याचा साथीदार कृष्णा बलखंडे हे दोघे एमएच-३२ डब्ल्यु-८६९२ क्रमांकाची दुचाकी घेवून फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून दुचाकीची कागदपत्रे विचारली असता, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्याकडून सदर दुचाकी जप्त केली. सदर दुचाकीबाबत सखोल तपास केला असता, चोरट्यांनी ही दुचाकी सहा महिन्यापूर्वी चोरल्याचे समोर आले.
उपरोक्त नमुद विधी संघर्षित बालक व त्याचा साथीदार हे दोघे पक्के चोर असून त्यांनी त्यांनी बुट्टीबोरी, नागपूर शहर व हिंगणघाट येथे बाईक चोरी, मंदिर चोरी व बाईमधील पेट्रोल चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. त्याच्याकडून तपासादरम्यान सहा दुचाकी, मंदिर चोरीतील रोख १,२७० रुपये व इतर साहित्य १०५० रुपये असा एकूण १ लाख ४७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषन पथकाचे निरंजन वरभे, अरविंद येनुरकर, निलेश तेलरांधे, दीपक जंगले यांनी केली आहे.
आणखी चोºया उघड होण्याची शक्यता
पोलिसांनी अटक केलेल्या अल्पवयीन आरोपीवर येथील पोलीस ठाण्यात मंदिर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे न्यायालयात या आरोपींची पोलीस कोठडी गरजेची आहे. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने ते शक्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याच्या सहकाºयाना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.