वैद्यकीय जनजागृती मंचची विरूळात डेंग्युविरोधी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:48 PM2017-11-19T23:48:10+5:302017-11-19T23:48:31+5:30
सध्या आर्वी तालुक्यातील विरूळ येथे डेंग्युने चांगलेच थैमान घातले आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला तर काहींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच....
आॅनलाईन लोकमत
वर्धा : सध्या आर्वी तालुक्यातील विरूळ येथे डेंग्युने चांगलेच थैमान घातले आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला तर काहींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांनी गावात भेट देत नारिकांना या जीवघेण्या आजाराविरोधात मार्गदर्शन केले.
वैद्यकीय जनजागृती मंचाच्या डेंग्यू प्रतिबंध अॅक्टिव्हिटीमुळे वर्धा जिल्ह्यातील कीटकजन्य आजारामध्ये बºयाच प्रमाणत घट झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी वैद्यकीय जन जागृती मंच वर्धा द्वारे डेंग्यु बद्दल लोकजागृती व माहिती पर कार्यक्रम ग्रामपंचायत विरुळ, प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा व स्थानिक पदाधिकारी यांच्या मार्फत बाजार चौक विरुळ येथे घेण्यात आला. यावेळी ‘संकल्प’ डास निर्मूलनाचा हा प्रोजेक्ट विरुळ येथील शाळेला व ग्रामस्थांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आलोक विश्वास यांनी केले तर डेंग्यु बद्दल सविस्तर मार्गदर्शन मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. परिसर स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन डॉ. वाडीभस्मे यांनी केले. डास निर्मूलनाची शपथ डॉ. यशवंत हिवंज, सचिन विजम यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम होते. यावेळी सरपंच साधना उईके, उपसरपंच संतोष येलने, पंचायत समिती सदस्य शोभा मनवार, आरोग्य सहाय्यक धरमढोक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वडुरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाने विरुळ ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.