अनुदानावर मिळणार डीएपी खत; तुम्ही अर्ज केला का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:27 PM2024-07-03T18:27:22+5:302024-07-03T18:28:01+5:30
Vardha : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात मदत
चिकणी (जामणी) : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात मदत व्हावी, यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत नॅनो युरिया व डीएपी खतासाठी अनुदान दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार होते. परंतु फार कमी शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नॅनो युरिया, डीएपी अनुदानावर
सन २०२४-२५ या चालू खरीप हंगामात अनुदानाच्या योजना अंतर्गत नॅनो युरिया व डीएपी सोयाबीन, कापूस आदी पिकांकरिता अनुदानावर मिळणार आहे.
येथे करण्यात आले ऑनलाईन अर्ज
निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थीची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खते या बाबींतर्गत अर्ज करायचा होता. शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.i/farmer/login/ login या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे.