दिवसा घरफोडी करणारा चोरटा नागपुरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 05:00 AM2022-03-25T05:00:00+5:302022-03-25T05:00:31+5:30
दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ, स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरू असतानाच शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अट्टल चोरटा सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने यास नागपूर येथून अटक करीत त्याच्याकडून कुलूप तोडण्यासाठी वापरलेली सळाख, कैची असा मुद्देमाल हस्तगत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षकाच्या घरी भरदिवसा घरफोडी करून १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरास सेवाग्राम पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने (वय २२) रा. सुभाषनगर नागपूर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ, स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरू असतानाच शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अट्टल चोरटा सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने यास नागपूर येथून अटक करीत त्याच्याकडून कुलूप तोडण्यासाठी वापरलेली सळाख, कैची असा मुद्देमाल हस्तगत केला. चोरट्याची कसून चौकशी केली असता त्याने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिल्याने आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात हरिदास काकड, गजानन कठाणे, प्रकाश लसुूनते, पवन झाडे यांनी केली असून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे.