500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या 'त्या' नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 09:21 AM2017-10-14T09:21:13+5:302017-10-14T11:05:54+5:30

बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून अखेर मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहरी  येथील शेतकरी भगवान टेकाम यांच्या ज्वारीच्या शेतात विद्युत प्रवाह लावला असता, त्या प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

The death of the 'canned' cannibal waghini which reached 500 kms | 500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या 'त्या' नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू

500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या 'त्या' नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू

Next
ठळक मुद्देबोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून अखेर मृत्यू झाला आहेनरभक्षक वाघिणीच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी या वाघिणीला ठार मारण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैध ठरवला होतामात्र त्याआधीच विजेचा करंट लागल्याने वाघिणीचा मृ्त्यूचंद्रपूरच्या जंगलातल्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 500 किलोमीटर्सचा प्रवास केला होता

वर्धा - बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून अखेर मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहरी  येथील शेतकरी भगवान टेकाम यांच्या ज्वारीच्या शेतात विद्युत प्रवाह लावला असता, त्या प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचं म्हणजं बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी या वाघिणीला ठार मारण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैध ठरवला होता. हा आदेश वैध ठरला असला तरी, सुरुवातीला वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार होते. यादरम्यान, वाघिणीने परत माणसांवर हल्ले केल्यास तिला ठार मारण्यात येणार होते. पण त्याआधीच विजेचा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूरच्या जंगलातल्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 500 किलोमीटर्सचा प्रवास केला होता. मिळेल ती जनावरं मारून खाणाऱ्या या वाघिणीनं दोन माणसांचा जीव घेतला आणि वनविभागानं तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला मारू नये अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे करण्यात आली होती. 

बोरच्या जंगलात 29 जुलै रोजी म्हणजे सुमारे 76 दिवसांपूर्वी या वाघिणीला सोडण्यात आले होते. जंगलं, नद्या नाले, महामार्ग वाटेत येणारी गावं असा प्रवास केलेली ही वाघिण भोरला पुन्हा आली होती. या परिक्रमेदरम्यानच्या काळात तिनं 500 किलोमीटरचा प्रवास केला. तिच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर असल्यामुळे तिची प्रत्येक हालचाल वनविभागाचे अधिकारी टिपत आहेत. त्यातूनच जनावरांवरील हल्ल्यांसह दोन माणसांच्या मृत्युलाही हीच वाघिण जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. अखेर वनविभागानं नरभक्षक झालेल्या या वाघिणीला संपवण्याचा निर्णय घेतला होता.

अशी आहे प्रकरणाची पार्श्वभूमी
या वाघिणीला ठार मारण्यासाठी तीनदा आदेश जारी करण्यात आले. तिन्हीवेळी डॉ. बनाईत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, दोनदा वन विभागाला न्यायालयाचा दणका सहन करावा लागला. पहिले दोन आदेश अवैध ठरविण्यात आले. परंतु, तिसरा आदेश वैध ठरला. ही वाघिण सुरुवातीला ब्रह्मपुरी वनक्षेत्रात होती. त्यावेळी तिने माणसांवर हल्ले केल्यामुळे प्रधान मुख्य वन संवर्धक (वन्यजीव) यांनी तिला ठार मारण्यासाठी गेल्या २३ जून रोजी पहिला आदेश जारी केला होता. तो आदेश न्यायालयात रद्द झाल्यानंतर तिला १० जुलै रोजी बेशुद्ध करून पकडण्यात आले. दरम्यान, तिला काही दिवस गोरेवाडा येथे निरीक्षणाखाली ठेवून २९ जुलै रोजी बोर अभयारण्यात सोडण्यात आले. तिने परत माणसांवर हल्ले सुरू केले. परिणामी, तिला ठार मारण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी दुसरा आदेश जारी करण्यात आला. न्यायालयाने दुसरा आदेश अवैध ठरवून तो रद्द करण्याची तंबी दिल्यानंतर वन विभागाने स्वत:च आदेश मागे घेतला होता. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी तिसरा आदेश जारी करण्यात आला. हा आदेश वैध ठरविण्यात वन विभागाला यश मिळाले होते.
 

Web Title: The death of the 'canned' cannibal waghini which reached 500 kms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.