पावसाचा हाहाकार, भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू; आर्वी-अमरावती मार्गावर वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 04:25 PM2021-09-09T16:25:46+5:302021-09-09T16:28:02+5:30

नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर घरांचीही पडझड झाली आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असल्याने आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. 

The death of the couple in wall collapse due to Heavy rain in Wardha, Traffic jam on Arvi-Amravati route | पावसाचा हाहाकार, भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू; आर्वी-अमरावती मार्गावर वाहतूक ठप्प

पावसाचा हाहाकार, भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू; आर्वी-अमरावती मार्गावर वाहतूक ठप्प

googlenewsNext

वर्धा - सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने पती-पत्नीचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने गावामध्ये स्मशान शांतता होती. भिंतीच्या मातीमध्ये दोघांचेही मृतदेह गाडल्या गेल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. त्यांच्या परिवारातील काही सदस्य जखमी झाले आहे. (The death of the couple in wall collapse due to Heavy rain in Wardha, Traffic jam on Arvi-Amravati route)

रामकृष्ण महादेव चौधरी (४५) व ज्योती रामकृष्ण चौधरी (४०) रा. दहेगाव (गोंडी), असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा आदित्य रामकृष्ण चौधरी (१५) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी प्रशासनानेही नोंद घेतली असून कार्यवाही सुरु आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वर्धा-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील उर्ध्व वर्धा (सिंबोरा) प्रकल्पात ९४.६९ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे १३ पैकी ७ दरवाजे ५० से.मी.ने उघडण्यात आले असून ५६३ घ.मी.प्र.से. पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले. या नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने या प्रकल्पाचेही सर्व ३१ दरवाजे उघडण्यात आल्याने ३०३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर घरांचीही पडझड झाली आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असल्याने आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. 

Web Title: The death of the couple in wall collapse due to Heavy rain in Wardha, Traffic jam on Arvi-Amravati route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.